सचिन पायलटांवर कारवाई होताच भाजप झाली सक्रीय, अशोक गहलोतांनीही लावली 'फिल्डिंग'

सचिन पायलटांवर कारवाई होताच भाजप झाली सक्रीय, अशोक गहलोतांनीही लावली 'फिल्डिंग'

सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. तर गहलोत यांनी राजभवन गाठले आहे.

  • Share this:

जयपूर, 14 जुलै : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना हटवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले. पण, काँग्रेसने मनधरणी करुनही पायलट माघारी परतले नाही. अखेर त्यांच्यावर कारवाई करत उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यानंतर भाजप आता सक्रीय झाली आहे.

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. पण, काँग्रेसने जुने जानते नेते अशोक गहलोत यांच्यावर विश्वास दाखवत पायलट यांच्यावर कारवाई केली आहे.  सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन बाजूला हटवले आहे.  तसंच  सचिन पायलट यांना राजस्थान काँग्रेस युथ अध्यक्ष पदावरुनही हटवले आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह डोटासरा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. त्याचबरोबर सचिन पायलट यांच्यासह 3 मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

दारुड्याचं भयंकर कृत्य! 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार, गंभीर जखमी

सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन  मंत्री वी.सतीश,  गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर हजर आहे. या बैठकीमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागण्यावर चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर हे दिल्लीवरुन जयपूरला रवाना झाले आहे.

तर दुसरीकडे अशोक गहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी 105 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच पायलट यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  राजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता आहे. राजभवनावर गहलोत पोहोचले असून त्यांनी आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे. त्यानंतर राज्यपाल आता काय निर्णय देता हे पाहण्याचं ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: July 14, 2020, 2:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading