राजस्थान, 29 जानेवारी: राजस्थान
(Rajasthan) महिलांसाठी सतत असुरक्षित होत चालला आहे
(woman atrocities in Rajasthan). राज्यात प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारासंबंधी बातमी समोर येत आहे. आता अलवरमध्ये
(Alwar) मूकबधीर अल्पवयीन मुलीवरील
(Alwar minor girl case) झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता एका महिलेवर बलात्कार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
अलवरमध्ये गावातील एक तरुणावर महिलेवर बलात्कार करुन अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर
(social media viral video) आपल्या चार मित्रांसोबत शेअर ही केला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व चार मित्रांवर हॉटेलमध्ये घेऊन जाऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे.
चिंता वाढवणारी बातमी: NeoCoV खतरनाक Corona व्हेरिएंट?
पीडित महिलेला चिंतेत बघितल्यावर महिलेच्या पतीनं तिला विचारलं, तेव्हा सर्व प्रकरण समोर आलं. महिलेनं आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली.
आरोपीने हॉटेलमध्ये आपल्या पत्नीची ID कार्ड दाखवलं
मीडिया अहवालानुसार, अलवरच्या मालकारेरा पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार महिलेचा पती खासगी कंपनीत काम करतो आणि तिच्या घरात सासू- सासरे आणि दोन मुले आहेत. घरात गुरं असल्यामुळे समुद्र नावाचा तरुण महिलेच्या घरी बऱ्याच काळापासून दूध घेण्यासाठी यायचा आणि पीडित महिला त्याला ओळखत होती.
महिलेनं आरोप केला आहे की, डिसेंबर महिन्यात समुद्रनं आपल्याला बलात्कार करुन व्हिडिओ बनवला आणि आपल्या 4 मित्रांसोबत शेअर केला. त्यानंतर मित्रांना व्हिडिओ मिळाल्यानंतर त्यांनी मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्या मित्रांनीही माझ्यावर बलात्कार केला.
IPL 2022 : आयपीएल खेळण्यासाठी भूतानचा खेळाडू सज्ज, धोनीशी आहे खास कनेक्शन
पुढे पीडितेनं आरोप केला आहे की, आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. महिलेनं सांगितलं की, आरोपींनी हॉटेलमध्ये मला त्यांची पत्नी असल्याचं सांगून बलात्कार केला. पीडितेनं पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं गुरुवारी एसपी याच्याकडे जाऊन न्यायाची मागणी केली.
पतीसमोर रडली पत्नी
पीडितेचा पती एका कंपनीत नोकरी करतो. तो कामानिमित्त घरापासून लांब राहतो. तो घरी परतल्यावर त्याला पत्नीसोबत झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाली. पीडितेनं चारही आरोपी समुद्र सिंह, श्याम सिंह, दिनेश आणि गिर्राज यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेशला अटक केली आहे. पीडितेनं सांगितलं की, आरोपींनी तक्रार मागे घ्यावा यासाठी घरी येऊन धमकी देत आहे. या विषयावर डीएसपी कमल यांनी सांगितले की, त्या महिलेचा जबाब पोलिसांनी घेतला आहे आणि अन्य आरोपींच्या अटकेशिवाय पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.