मराठी बातम्या /बातम्या /देश /

Crime:शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी तीन वर्षाच्या नातीची आपटून केली हत्या, तपासात असं झालं सिद्ध

Crime:शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी तीन वर्षाच्या नातीची आपटून केली हत्या, तपासात असं झालं सिद्ध

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

Rajasthan Crime - पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांना, आरोपी कनकबाई हिच्यावर संशय आला होता. तिचं वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटलं. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताचं, सर्व सत्य बाहेर आलं.

  • Published by:  News18 Desk

बारां (राजस्थान), 10 जून: राजस्थानच्या बारांमधून (Bara Rajasthan) एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली आहे. याठिकाणी अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला (3 year old girl child) तिच्या आजीनं जमिनीवर आपटून आपटून (Grandmother killed grand daughter) तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या घटनेमागचं जे कारण समोर आलं ते अत्यंत धक्कादायक असं आहे. शेजाऱ्यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी या महिलेनं नातीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

बारां येथील बोरिना गावातील ही घटना आहे. याठिकाणी एका आजीनं तिच्या नातीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर महिलेनं शेजाऱ्यांना या खुनाच्या आरोपात फसवण्याचा कटही रचला. मात्र पोलिसांनी तपासादरम्यान सत्य समोर आणलं. त्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे.

(वाचा-शिक्षक नव्हे भक्षक! दोन शिक्षकांचा चिमुरडीवर अत्याचार, गर्भवती राहिली अन्..)

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, बोरीना गावातील या दोन कुटुंबांमध्ये पाणी भरण्याच्या मुद्द्यावरून वाद झाले होते. हे वाद एवढे वाढले की, हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं होतं. यात दोन्ही बाजुच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. त्यात अमरलाल मोग्या यांच्या 3 वर्षांच्या मुलीचा डोक्यावर जबर मार लागल्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांनी दुसऱ्या कुटुंबाविरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. तपासात असं समोर आलं की, दोन्ही कुटुंबांमध्ये पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या रस्त्यावरून वाद झाला होता. त्यात झालेल्या मारामारीत दोन्हीकडील सदस्य जखमी झाले होते.

(वाचा-BJP नेत्याच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, आधी बलात्कार..डोळे काढले, त्यानंतर...)

या हाणामारीत रामेश्वर मोग्या यांच्या 12 वर्षांच्या मुलीला डोक्याला जखम झाली. दुसऱ्या कुटुंबातील अमरलाल मोग्या यांचे भाऊ धनराज आणि वडील लटूरलाल हे जखमी झाले. रामेश्वर मोग्या जखमी मुलीला घेऊन पोलिसांत तक्रार करायला निघाले तर अमरलाल यांच्या आईनं त्यांना अडवलं. पोलिसांत गेले तर त्याची किंमत तुम्हालाही मोजावी लागेल अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी कनकबाई यांनी त्यांच्याच तीन वर्षाच्या नातीला जमिनीवर डोकं आपटून तिची हत्या केली. त्यानंतर मृत चिमुकलीला घेऊन कुटुंबीय रामेश्वर मोग्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसांत पोहोचले.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांना, आरोपी कनकबाई हिच्यावर संशय आला होता. तिचं वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटलं. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताचं, सर्व सत्य बाहेर आलं. महिलेनंही तिच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली.

First published:

Tags: Rajasthan