विकृती! भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, पत्नीवर पतीनं भावासोबत केला बलात्कार

विकृती! भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार, पत्नीवर पतीनं भावासोबत केला बलात्कार

निस्वार्थ प्रेम करून ज्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंच आयुष्यभरासाठी न विसरता येणारं दुःख 'ती'ला दिलं आहे.

  • Share this:

जयपूर, 5 ऑगस्ट : निस्वार्थ प्रेम करून ज्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंच आयुष्यभरासाठी न विसरता येणारं दुःख 'ती'ला दिलं आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम पतीनं पत्नीवर आपल्याच छोट्या भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. पत्नीनं यास थेट नकार देत त्याचा दबाव झुगारला. बराच छळ करूनही पत्नी ऐकत नसल्याचं पाहून पतीनं छोट्या भावासोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील ही संतापजनक घटना आहे.

या सगळ्यातून पीडित महिलेनं कशीबशी स्वतःची सुटका करून आपलं माहेर गाठलं. यानंतर तिनं पती आणि त्याच्या भावाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं. दरम्यान, घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पण अद्याप त्यांच्याबाबतचा कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.

(वाचा :  लज्जास्पद! घरात एकट पाहून मामानं केला भाचीवर बलात्कार)

भावांनी केला सामूहिक बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं चार वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. तर तीन दिवसांपूर्वी महिलेचा पती तिला आपल्या भावासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करू लागला. पण यावर महिलेचा नकार ठाम होता. तर पतीनं भावासोबत मिळून तिला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

(पाहा :भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा)

मारहाण आणि गँगरेपचा गुन्हा दाखल

यानंतर पीडित महिलेनं आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेनं पती आणि त्याच्या भावाविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार या दोघांविरोधातही मारहाण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 5, 2019, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading