मराठी बातम्या /बातम्या /देश /

''सॉरी पापा...माझ्या अधुऱ्या...'', गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट

''सॉरी पापा...माझ्या अधुऱ्या...'', गँगरेप झालेल्या अल्पवयीन मुलीची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl)  सामूहिक बलात्कार  (Committed Suicide) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) सामूहिक बलात्कार (Committed Suicide) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) सामूहिक बलात्कार (Committed Suicide) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

राजस्थान, 29 डिसेंबर: राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेरमध्ये (Barmer)16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) सामूहिक बलात्कार (Committed Suicide) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली आहे. पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान हे संपूर्ण प्रकरण समोर आले, त्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अल्पवयीन मुलीचे नातेवाईक जेव्हा मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जात होते, तेव्हा मुलीच्या कपड्यांमध्ये एक कागद सापडला. ज्यामध्ये घटनेचे संपूर्ण वर्णन आणि आरोपींची नावे लिहिलेली होती. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी नातेवाईकांकडून सुसाईड नोट ताब्यात घेतली.

हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण आहे: पोलीस

बाडमेर पोलिसांनी सांगितले की, मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे हे प्रकरण असून त्यात एक आरोपीही अल्पवयीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिको परिसरात राहणारी 16 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती.

हेही वाचा-  सावध..! TV सिरियल बघण्यात महिला व्यस्त; घरात घुसले चोर; अन्... 

आत्महत्येच्या दिवशी रात्री मुलीचे कुटुंबीय बाहेर गेले असता, मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, अंत्यसंस्कार करताना सापडलेल्या सुसाईड नोटवरून कुटुंबाला संपूर्ण घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र सिंह आणि एका अल्पवयीन मुलाने रविवारी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे आणि कोणालाही सांगितल्यास कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली.

सॉरी पापा, माझ्या अपूर्ण स्वप्नांची काळजी घ्या: अल्पवयीन पीडित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीकडे एक पानाची सुसाईड नोट सापडली असून, त्यात लिहिले आहे की, मी मरणार आहे, माझ्या सर्व वस्तू कोणालाही देऊ नका, मला मरायचे नाही, पण काय करु? लोक माझ्या वडिलांना ऐकवतील. माझी स्वप्ने अजूनही अपूर्ण आहेत. महेंद्र आणि त्याच्या मित्राने खोटं बोलून बाहेर बोलावलं आणि माझी बदनामी झाली.

हेही वाचा- महाराष्ट्रात तिसरी लाट निश्चित?, Covid टास्क फोर्सनं घेतला मोठा निर्णय

मुलीने पुढे लिहिले की, माझ्या आई आणि वडिलांना कोणी काही बोलू नका. पापा मला माफ करा आणि माझे कपडे आणि सर्वकाही योग्य ठिकाणी ठेवा. मी काही चुकीचे केले नाही...तुमची मुलगी.. माझ्या मृत्यूचे कारण महेंद्र आणि त्याचा मित्र आहे.

पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

सुसाइड नोट सापडल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. जिथे पोलिसांनी हा सामूहिक बलात्कार मानून पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला कक्षाचे एएसपी हजारीराम करत आहेत. सध्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

First published:

Tags: Gang Rape, Rajasthan