रामकथा ऐकतानाच वादळाने मंडप कोसळला, 14 भाविकांचा मृत्यू

रामकथा ऐकतानाच वादळाने मंडप कोसळला, 14 भाविकांचा मृत्यू

प्रचंड वेगाचा वारा आल्याने लोखंडी खांबांवर तयार केलेला भव्य मंडप कोसळून पडला. वीजचे खांबही कोसळल्याने कंरटही आला होता.

  • Share this:

जयपूर 23 जून : राजस्थानात रविवारी घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच धक्का बसला. रामकथा ऐकण्यात तल्लीन असलेल्या भाविकांवर वादळामुळं मंडप कोसळल्याने 14 भाविकांचा मृत्यू झाला. तर 50 जण जखमी झालेत. बाडमेर जिल्ह्यातल्या जसोल गावात ही घटना घडली. जखमींना बाडमेरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.जसोलमधल्या शाळेच्या मैदानावर रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी सहा हजार फुटा भव्य मंडपही घालण्यात आला होता.

रामकथा ऐकण्यासाठी शेजारच्या गावांमधूनही लोक आले होते. रविवारी दुपारनंतर वातावरण बदललं. प्रचंड वेगाचा वारा आल्याने लोखंडी खांबांवर तयार केलेला भव्य मंडप कोसळून पडला. मंडपासाठी मोठ मोठे लोखंडी पाईप बांधण्यात आल्याने ते पाईप भाविकांच्या अंगावर पडले.

लोखंडी पाईप आणि सळ्यांच्या वजनामुळे मंडपच खाली कोसळला. त्याखाली भाविक दबले गेले. मंडपात 1 हजार भाविक उपस्थित असल्याने घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. त्या चेंगराचंगरीत 50 भाविक जखमी झालेत. मंडपातू बाहेर पडण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत होते. यात महिला आणि मुलांना जास्त फटका बसला. मंडपासोबतच विजेचे खांबही कोसळल्याने मंडपात करंट आला होता. हा कंरट लागल्यानेही काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

स्थानिक लोकांनी तातडने मदत कार्याला सुरुवात केली. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तर जे लोक मंडपाखाली अडकले होते त्यांना लोकांनी बाहेर काढलं. सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tags: rajasthan
First Published: Jun 23, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading