Rajasthan Assembly Election Result 2018: मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर की बसला धक्का?

Rajasthan Assembly Election Result 2018: मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर की बसला धक्का?

Rajsthan Assembly Election Result 2018 LIVE: मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या मतदारसंघात कमळ फुलणार?

  • Share this:

जयपूर, 11 डिसेंबर : मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्यांच्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे सध्या 4000 मतांची आघाडी आहे. राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे या झालरापाटन या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढत आहेत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढत आहे.

First Published: Dec 11, 2018 08:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading