मोदी की राहुल कोण ठरलं यशस्वी प्रचारक, पाहा Special Report

केंद्रातील सत्ताधारी भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे मोदींचा करिश्मा संपला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 12:53 PM IST

मोदी की राहुल कोण ठरलं यशस्वी प्रचारक, पाहा Special Report

मुंबई, 11 डिसेंबर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे मोदींचा करिश्मा संपला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोदी की राहुल, कोण ठरलं यशस्वी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेत एकूण 65 मतदासंघ कव्हर केले होते. या 65 पैकी 35 जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. म्हणजेच मोदींचा सक्सेस रेट हा 55 टक्के इतका आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या काळात सभा घेत 129 मतदारसंघ कव्हर केले. यातील 63 जागांवर आता काँग्रेस उमेदवार पुढे असल्याचं दिसत आहे. याचाच अर्थ राहुल गांधींचा सक्सेस रेट हा 49 टक्के इतका आहे.

या आकड्यांनुसार नरेंद्र मोदींच्या सभांचा सक्सेस रेट आजही जास्त आहे. असं असलं तरीही या स्पर्धेत आधी खूपच मागे असणारे राहुल गांधी यांच्याकडून आता मात्र मोठं आव्हान निर्माण केलं जात असल्याचं चित्र आहे.

Loading...

दरम्यान, राहुल गांधी यांनी या पाचही राज्यांच्या निवडणुकीसाठी मोठा जोर लावला होता. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोर लावत राहुल गांधींनी अक्षरशः सभांवर सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सगळा जोर रासस्थानात लावला होता. त्यांनी त्या राज्यात १२ सभा घेतल्या.

मोदींनी राजस्थानात 12, मध्य प्रदेशात 10, छत्तीसगडमध्ये 4, तेलंगणात 5 आणि मिझोराममध्ये 1 अशा एकूण ३२ सभा घेतल्या. याउलट राहुल गांधींनी दुपटीपेक्षा जास्त सभा घेतल्या. राहुल गांधींनी एकूण 82 सभा घेतल्या. मध्य प्रदेशात 25, राजस्थानात 19, छत्तीसगडमध्ये 19, तेलंगाणात 17 आणि मिझोराममध्ये 2 सभा घेतल्या.

याआधीच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी स्वतः सभा घेत चांगला जोर लावला होता. गुजरातच्या 182 जागांच्या विधानसभेसाठी 34 सभा घेतल्या.


VIDEO : ...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...