AssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

द्रातील सत्ताधारी भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. यावर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 01:20 PM IST

AssemblyElection2018 : धक्कादायक निकालांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

जयपूर, 11 डिसेंबर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे. यावर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

निवडणूक निकाल आणि त्याचे परिणाम

तेलंगणा निकाल अपडेट्स : टीआरएस-89, काँग्रेस -21, इतर-9 जागांवर आघाडीवर

छत्तीसगड निकाल अपडेट्स : भाजप-18, काँग्रेस - 66, इतर-06 जागांवर आघाडीवर

मध्य प्रदेश निकाल अपडेट्स : भाजप -108, काँग्रेस -112, इतर-10 जागांवर आघाडीवर

Loading...

राजस्थान निकाल अपडेट्स : भाजप -79, काँग्रेस - 99, इतर -21 जागांवर आघाडीवर

मिझोराम निकाल अपडेट्स : एमएनएफ-25, काँग्रेस -6, इतर- 9 जागांवर आघाडीवर

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता होती, या तिन्ही ठिकाणी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या गडाला भगदाड पडले आहे.

तेलंगणात सत्ताधारी टीआरएसने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असली तरी जुन्या हैदराबादमधल्या सर्व सात पैकी 5 जागांवर असदुद्दीन ओवेसींच्या 'MIM'ने आघाडी घेतलीय. या सातही जागांवर ओवेसींचा प्रभाव आहे. मागच्या निवडणुकीत 'MIM'ला 6 जागा मिळाल्या होत्या. सकाळी 10.30 वाजेपर्यंत सत्ताधारी टीआरएसची तब्बल 90 जागांवर आघाडी होती.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 01:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...