भाजपला आणखी एक धक्का, मुस्लीम कार्ड फेल

भाजपला आणखी एक धक्का, मुस्लीम कार्ड फेल

टोंक या विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचमुळे भाजपकडून हे कार्ड वापरण्यात आलं.

  • Share this:

जयपूर, 11 डिसेंबर : राजस्थानमध्ये भाजपने वापरलेलं एकमेव मुस्लीम कार्ड फेल झालं आहे.

राजस्थानमधील 199 जागांपैकी केवळ एका जागेवर भाजपने मुस्लीम उमेदवार दिला होता. काँग्रेसचे युवा नेते असलेल्या सचिन पायलट यांच्याविरोधात टोंक या विधानसभा मतदारसंघात भाजपकडून युनूस खान हे उभा होते. पण सचिन पायलट यांनी त्यांच्यावर मोठा विजय मिळवला आहे.

राजस्थानात इतर कोणत्याही ठिकाणी मुस्लीम उमेदवार न दिलेल्या भाजपने टोंकमध्ये मात्र युनूस खान यांना उमेदवारी दिली होती. याचं कारण होतं टोंकमध्ये असलेली मुस्लीम मतदारांची संख्या. या विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचमुळे भाजपकडून हे कार्ड वापरण्यात आलं. मात्र आता ते फेल झालं आहे.

राजस्थानात काँग्रेस 101 तर भाजप 75 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आघाडी घेताच मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजस्थानात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे.


बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेलबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 02:43 PM IST

ताज्या बातम्या