Assembly Election Result 2018: 'कोण होणार मुख्यमंत्री - राहुल गांधींना विचारा'

Assembly Election Result 2018: 'कोण होणार मुख्यमंत्री - राहुल गांधींना विचारा'

Assembly Election Result 2018 Rajastan : राजस्थानातील प्राथमिक कलानुसार काँग्रेस सत्ता स्थापण करणार, असं चित्र आहे. यावर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

  • Share this:

जयपूर, 11 डिसेंबर : 'राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार, हे राहुल गांधींनाच विचारा,' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राजस्थानातील मोठे नेते अशोक गहलोत यांन दिली आहे. राजस्थानातील प्राथमिक कलानुसार काँग्रेस सत्ता स्थापण करणार, असं चित्र आहे. यावर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

'संपूर्ण निकाल लागल्यानंतर आमच्या आमदारांची एक बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेतला जाईल,' असंही गहलोत म्हणाले.

राजस्थानात काँग्रेस 101 तर भाजप 63 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आघाडी घेताच मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजस्थानात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढत आहेत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढत आहे.

First published: December 11, 2018, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading