अच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'

अच्छे दिन आल्यानंतर आता राजस्थान काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार, यासाठी आता उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

जयपूर, 11 डिसेंबर : राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांमध्ये ही स्पर्धा आहे. यावर अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत उद्या अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली आहे. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार, यासाठी आता उद्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. 'राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार, हे राहुल गांधींनाच विचारा,' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राजस्थानातील मोठे नेते अशोक गहलोत यांनी काही वेळापूर्वी दिली होती. राजस्थानातील प्राथमिक कलानुसार काँग्रेस सत्ता स्थापण करणार, असं चित्र आहे. यावर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

'संपूर्ण निकाल लागल्यानंतर आमच्या आमदारांची एक बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेतला जाईल,' असंही गहलोत म्हणाले.

राजस्थानात काँग्रेस 101 तर भाजप 63 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आघाडी घेताच मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजस्थानात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढत आहेत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading