Assembly Election Result 2018: : काँग्रेसचे अनुभवी अशोक गहलोत आघाडीवर

Assembly Election Result 2018 LIVE: काँग्रेसचे अनुभवी अशोक गहलोत बाजी मारणार? Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Telangana and Mizoram Election Results with News18 Lokmat.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 08:37 AM IST

Assembly Election Result 2018:  : काँग्रेसचे अनुभवी अशोक गहलोत आघाडीवर

जयपूर, 11 डिसेंबर :काँग्रेसचे अनुभवी अशोक गहलोत हे त्यांच्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. याआधी दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे अनुभवी नेते अशोक गहलोत यांच्या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे. ते जोधपूरमधील सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून शंभू सिंग खेतसर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. 2013 साली झालेल्या निवडणुकीत गहलोत यांनी खेतसर यांचा 18000 मतांनी पराभव केला होता.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यासध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट नेतृत्व करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढतायत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढतंय. त्यांचे उमेदवार उभे आहेत.

Loading...


VIDEO : ...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 08:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...