दुपारी 1 वाजेपर्यंत राजस्थानमध्ये 41.33 टक्के तर तेलंगणामध्ये 43.24 टक्के मतदान

दुपारी 1 वाजेपर्यंत राजस्थानमध्ये 41.33 टक्के तर तेलंगणामध्ये 43.24 टक्के मतदान

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. आज म्हणजे 7 डिसेंबरला राजस्थान आणि तेलंगनामध्ये विधानसभेसाठी मतदान करण्यात आलं आहे.

  • Share this:

राजस्थान/तेलंगाणा, 06 डिसेंबर : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. आज म्हणजे 7 डिसेंबरला राजस्थान आणि तेलंगनामध्ये विधानसभेसाठी मतदान करण्यात आलं आहे.  विधानसभा निवडणुकांच्या या रणसंग्रामात राजस्थानमध्ये भाजप आणि तेलंगणामध्ये टीआरएस सत्तेमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ताधारी पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

शुक्रवारी राजस्थानमध्ये 199 जागांसाठी तर तेलंगणामध्ये 119 जागांसाठी मतदान होत आहे. तर राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात रामगड मतदार संघात बीएसपी उमेदवाराचे निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलेलं नाही. तेलंगणामध्ये एकूण 119 जांगावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

तेलंगणात नक्षल प्रभावित 13 जागांवर संध्याकाळी 4 वाजता आणि इतर जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर राजस्थानमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या आजच्या मतदानाच्या रणधुमाळीत दुपारी 1 वाजेपर्यंत 41.33 टक्के मतदान झालं आहे. तर तेलंगणामध्ये 1 वाजेपर्यंत 43.24 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

आता राजस्थानबद्दल बोलायचं झालं तर ही निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी मोठी प्रतिष्ठेची मानली जाते. दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षाच्या नेत्याविरोधात धमदार उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकांची तुफान चर्चा आहे.

एकूण २०० जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये ५१,६८७ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार असून, १३० जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगणार आहे.

तर दुसरीकडे तेलंगणामध्ये टीआरएस विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. तेलंगणामध्येही विधानसभेच्या ११९ जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणामध्ये ३२ हजार ८१५ केंद्रांवर मतदान होत असून, अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.

तेलंगणा विधानसभेच्या 14 माओवादप्रभावित मतदारसंघासह 119 जागासाठी आज मतदान होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण तेलंगनात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल एक लाख जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून तेलंगणाला लागून असलेल्या गडचिरोलीसह छत्तीसगड आंध्रप्रदेश या चार राज्याच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा यांच्या समोर नुकतंच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला दिग्गज नेता जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांना उभं करण्यात आलं आहे. मुस्लीम-प्रभुत्व असलेल्या टोंक मतदारसंघात सचिन पायलट यांच्याविरोधात भाजपचा एकमेव मुस्लीम उमेदवार युनुस खान मैदानात आहे. वर्तमानात एआयसीसी महासचिव रुपात कार्यरत गहलोत हे सरदारपुरामध्ये आपला गड सुरक्षितरित्या लढवत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 07:46 AM IST

ताज्या बातम्या