Elec-widget

कैदी नं.130, आसारामची नवी ओळख

कैदी नं.130, आसारामची नवी ओळख

आसाराम कैदी क्रमांक 130 असून त्याला विशेष कोठडीत ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेचा आणि खबरदारी म्हणून आसारामला इतर कैद्यांना भेटू देण्यात येत नाही.

  • Share this:

जोधपूर,ता.25 एप्रिल: बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या आसारामचं आजपासूनच आता खऱ्या कैद्याचं जीवन सुरू झालं. आसाराम कैदी क्रमांक 130 असून त्याला विशेष कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवलं नसल्यामुळं नेहमीचे कपडे वापरण्याची परवानगी होती. आता मात्र त्याला कैद्याचा पोशाख देण्यात आलाय. आसारामचं वय सध्या 77 वर्ष असल्यानं त्याला झेपेल तसच काम त्याला देण्यात येणार आहे.

इतर कैद्यांना मिळतं तेच जेवणं त्याला देण्यात येणार आहे. सुरक्षा आणि खबरदारी म्हणून आसारामला वेगळं ठेवण्यात आलं असून इतर कैद्यांना त्यांना भेटू देण्यात येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...