पोलीस कॉन्स्टेबलनं विवाहितेवर केला बलात्कार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

पोलीस कॉन्स्टेबलनं विवाहितेवर केला बलात्कार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

एका पोलीस कॉन्स्टेबलने 32 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एवढेच नाही तर या पोलीसानं आपल्या सहकाऱ्यांनाही यात सामील केले.

  • Share this:

अलवर (राजस्थान), 13 ऑगस्ट : लोकांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांपासूनच जेव्हा धोका निर्माण होते, तेव्हा ही बाब चिंतादायक असते. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधील अलवर येथे घडला. एका पोलीस कॉन्स्टेबलने 32 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एवढेच नाही तर या पोलीसानं आपल्या सहकाऱ्यांनाही यात सामील केले. त्याने याचे अश्लील व्हिडीओही तयार केले, आणि महिलेले ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 3 महिने हा त्रास सहन केल्यानंतर अखेर पीडित महिलेने या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या या महिलेला मारहाण करून बाहेर काढण्यात आले.

अलवर जिल्ह्यातील रैणी पोलीस ठाण्यात 32 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोपी कॉन्स्टेबल संजय कुमार (वय 28) याला पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम यांनी फैलावर घेतले आहे. सध्या या महिलेवर झालेल्या बलात्काराचा तपास राजगड पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

वाचा-रियामुळे कोल्हापूरच्या व्यक्तीला सहन करावा लागतोय शिवीगाळ, वाचा काय आहे कारण

रैणी पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल संजय कुमार (वय 28) यांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार केला, धमकावून या महिलेचे शारीरिक शोषण केले. या प्रकरणाची माहिती महिलेच्या नवऱ्याला कळल्यानंतर तो पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेला, मात्र यावेळी इतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला गेला नाही.

कॉन्स्टेबल करायचा महिलेचा पाठलाग

या पीडितेने पोलीस अधीक्षक तेजस्वानी गौतम यांच्याकडे तक्रार केली. यावेळी महिलेने ती बाहेर फिरायला गेल्यानंतर कॉन्स्टेबल संजयने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्रास दिला. एवढेच नाही तर, संजयने या महिलेला धमकावले. 3 महिन्यांपूर्वी संजयनं या महिलेवर बलात्कार केला गेला आणि त्याला धमकी दिली गेली की जर त्याने कोणाला काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करेल. यानंतर संजयनं वारंवार पीडितेला त्रास दिला.

वाचा-10 सेकंदात रस्त्यानं चालणाऱ्या तरुणानं सोडले प्राण, अंगावर शहारे आणणारा VIDEO

संजयवर गुन्हा दाखल

या प्रकरणी एसपी तेजस्वाणी गौतम यांनी सांगितले की, पीडित महिलेने त्यांची भेट घेतली. कॉन्स्टेबल संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराचा तपास राजगड एसएचओकडे सोपविण्यात आला आहे, तर स्वतंत्र उच्चस्तरीय तपास डीएसपी लक्ष्मणगड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तपासणीनंतर एसएचओ आणि गुन्हा नोंद न केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल.

Published by: Priyanka Gawde
First published: August 13, 2020, 10:17 AM IST

ताज्या बातम्या