4 विद्यार्थ्यांनी फटाक्यांमधून दारू काढून बनवला मोठा बॉम्ब, अचानक झाला स्फोट; हादरलं संपूर्ण शहर

4 विद्यार्थ्यांनी फटाक्यांमधून दारू काढून बनवला मोठा बॉम्ब, अचानक झाला स्फोट; हादरलं संपूर्ण शहर

जुना सुतळी बॉम्ब फोडून त्यातून दारू बाहेर काढली. याचा वापर करून ते मोठा बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न करीत होते.

  • Share this:

अलवर, 21 ऑक्टोबर : राजस्थानमधील अलवर शहरात एक धक्कादायक घटना घडली. येथील पॉलिटेक्निकचा अभ्यास करणारे चार विद्यार्थी एका मोठ्या स्फोटात जखमी झाले. या स्फोटोमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. हे चार विद्यार्थी दिवाळीसाठी फटाक्यांमधून दारू काढून मोठा बॉम्ब बनवण्याचा प्रयोग करत होते. यावेळी हा स्फोट झाला. यात 2 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर एकाची प्रकृती नाजूक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मुलतान नगर, एनईबी पोलीस स्टेशन परिसरात घडली. मंगळवारी संध्याकाळी स्थित दिवाकरी कॉलनीत हा प्रकार घडला. येथील घराच्या छतावर विद्यार्थी गौरव, अंकित, राजवंश आणि दीपक दिवाळीसाठी मोठा बॉम्ब बनवण्याचा प्रयोग करीत होते. यासाठी त्यांनी जुना सुतळी बॉम्ब फोडून त्यातून दारू बाहेर काढली. याचा वापर करून ते मोठा बॉम्ब बनविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी हा स्फोट झाला. स्फोट होताच विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला.

वाचा-बापरे! घरं गेली पाण्यात आणि मासे आले दारात, पाहा हा VIDEO

विद्यार्थ्यांमधील गौरवची गंभीर अवस्था पाहता प्राथमिक उपचारानंतर त्याला जयपूरला पाठविण्यात आले. तर वंश आणि अंकित यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा-OMG! 9 महिन्यांची गर्भवती 5 मिनिटांत धावली 1.6 किमी; पाहा VIDEO

दीपकवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी राजवंश आणि अंकित यांची प्रकृती चिंताजनक आहे घटनेनंतर एनईबी पोलीस ठाण्याव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थी आयपीएस व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी कोठून दारू आणि फटाक्यांचा साठा गोळा केला होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 21, 2020, 10:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या