VIDEO : धक्कादायक! 50 प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, 10 जणांचा मृत्यू

VIDEO : धक्कादायक! 50 प्रवाशांनी भरलेली बोट नदीत बुडाली, 10 जणांचा मृत्यू

बोट बुडत असल्याचं पाहून तेथील रहिवाशांनी चंबळ नदीत उडी मारली, त्यानंतर बोटही पाण्यात बुडली.

  • Share this:

बूंदी, 16 सप्टेंबर : देशात कोरोनामुळे आधीच लोक संकटात सापडली आहेत. याच दरम्यान मोठी दुर्घटना समोर आली आहे. 50 लोकांना एका ठिकाणहून दुसरीकडे घेऊन जाणारी बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. या बोटीमध्ये साधारण 50 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. काही कळायच्या आता बोट उलटली आणि घात झाला.

अनेकांनी बुडण्याच्या भीतीनं जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारून जाण्याची धडपड केली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF टीम घटनास्थली दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश येत आहे. तर 10 जणांना वाचवण्यात यश आललं आहे. 4 जण अद्यापही बेपत्ता असून NDRF कडून त्यांचा शोध सुरू आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात गोठडा कला गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे.

हे वाचा-VIDEO : क्रूरतेचा कळस! भररस्त्यात वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण

बोट बुडत असल्याचं पाहून तेथील रहिवाशांनी चंबळ नदीत उडी मारली, त्यानंतर बोटही पाण्यात बुडली. ज्यांना पोहता येत होते त्यांनी काही जणांचा जीव वाचवण्यांचा प्रयत्न केला आणि नदीकाठावर पोहोचले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

ग्रामस्थ आणि पोलिसांनी आपल्या पातळीवर बचावकार्य सुरू केलं. अपघात झाल्याची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकेही कोटा येथून रवाना झाल्या आहेत. जिल्हाधिकारी व एसपी यांनी अपघाताची माहिती घेतली व उच्च अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये साधारण 50 प्रवासी होते. गोथारा गावातून चंबळ नदी ओलांडत असताना अचानक तोल गेल्यानं बोट एका बाजूने उलटली आणि दुर्घटना घडली.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 16, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या