3 वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं अडकलं भांड्यात, आजोबांच्या चतुराईनं वाचला जीव

3 वर्षांच्या चिमुरड्याचं डोकं अडकलं भांड्यात, आजोबांच्या चतुराईनं वाचला जीव

राजस्थानमधील जलोर या गावी एक धक्कादायक घटना घडली. या गावी 3 वर्षांच्या चिमुरड्याचे डोकं एका भांड्यात अडकलं.

  • Share this:

जालोर (राजस्थान), 12 डिसेंबर : राजस्थानमधील जलोर या गावी एक धक्कादायक घटना घडली. या गावी 3 वर्षांच्या चिमुरड्याचे डोकं एका भांड्यात अडकलं. याआधी आपण अशा घटना वाचल्या असतील, मात्र हा प्रकार भयंकर होता. मात्र गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचा जीव वाचला.

घराबाहेर खेळत असताना अचानक अंगणात असलेले भांडे या चिमुरड्यानं डोक्यात घातले. त्यानंतर आईला ही गोष्ट कळली तेव्हा तीनं भाडे काढण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास घरातल्या सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांना हे भांडे काढण्यात यश आले नाही. घरातलेच नाही तर संपूर्ण गावानं हे भांडे काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण ते डोक्यातून बाहेर आले नाही. अखेर एका आजोबांनी हे भांडे कापण्याची शक्कल लढवली आणि यात ते यशस्वी झाले. अखेर भांडे कापल्यानंतर मुलाची सुटका झाली.

वाचा-प्रेम… इमोशन्स… बदला… ‘नागिन 4’मध्ये उलगडणार नवी रहस्य, पाहा VIDEO

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार जवळ जवळ अर्धा तास या मुलाचे डोके भांड्यात अडकले होते. सध्या सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये असे दिसून येत आहे की मुलाचे डोके एका भांड्यात अडकले आहे आणि तो जोरात ओरडत आहे. तर, गावचे लोक कटरने भांडे तोडत आहेत.

वाचा-VIDEO : बाप असावा तर असा! सामन्याआधी रोहितला आली लेकीची आठवण आणि...

वाचा-आता ATM कार्ड विसरलात तरी काढता येणार पैसे, जाणून घ्या स्टेट बँकेचा नवा उपक्रम

दरम्यान मुलाला वाचवल्यानंतर गावातील एका व्यक्तीने, "भांडे तोडण्यास सुमारे अर्धा तास लागला, आमच्यासाठी ते खूप अवघड होते. मात्र तीन वर्षांचा मुलगा आता सुरक्षित आहे.", असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या