मराठी बातम्या /बातम्या /देश /

क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

Truck and Cruiser collided in Nagaur: सकाळच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

Truck and Cruiser collided in Nagaur: सकाळच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

Truck and Cruiser collided in Nagaur: सकाळच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

नागौर, 31 ऑगस्ट : राजस्थानमधील नागौर (Nagaur Rajasthan) येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात (Major accident killed 11) झाला आहे. नागौर जिल्ह्यातील श्रीबालाजी परिसरात ट्रक आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक नागरिक दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

राहुल द्रविडच्या 'इंदिरानगर'मध्ये भीषण अपघात; आलिशान ऑडी कारही नाही वाचवू शकली 7 जणांचे प्राण

नागौर जिल्ह्यातील श्रीबालाजी परिसरातील बायपासवर हा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रुझरमध्ये जवळपास 17 प्रवासी प्रवास करत होते. सकाळच्या सुमारास या क्रुझरची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रुझर गाडीचा संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी बिकानेर येथील रुग्णालयात रेफर कऱण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलीस घेत आहेत.

First published:

Tags: Accident, Rajasthan