सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

मुंबई, २१ फेब्रुवारी २०१९- बॉलिवूड सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज २१ फेब्रुवारी २०१९ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेविश्लेषक अक्षय राठी यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंटवर ही दुःखद बातमी शेअर करताना म्हटलं की, ‘राजकुमार बडजात्या यांचं काही वेळापूर्वी निधन झालं. राजश्री प्रोडक्शनचे ते एक भक्कम खांब होते. सिनेमासाठीचं त्यांचं जे प्रेम होतं तसं प्रेम फार कमी लोकांमध्ये दिसतं. त्यांच्यासोबतचं संभाषण मी मीस करेन. जेव्हा मी राजश्रीच्या ऑफिसमध्ये जायचो तेव्हा आमच्यातलं संभाषण मला आठवत राहिल.’ राजकुमार यांच्या पश्चात पत्नी सुधा बरजात्या आणि मुलगा सूरज बडजात्या आहेत.राजश्री प्रोडक्शनच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही राजकुमार यांच्या निधनाची बाती शेअर करण्यात आली.राजकुमार यांनी त्यांच्या सिनेकरिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमांची निर्मिती केली. यात हम आपके है कौन? हम साथ साथ है, विवाह आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली. त्यांनी शेवटचा निर्मिती केलेला सिनेमा हम चार नुकताच १५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 11:33 AM IST

ताज्या बातम्या