राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन

राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन

2013पासून ते किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. मात्र त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये फारशी सुधारणा झालीच नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 1 ऑगस्ट: राज्यसभेचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दीर्घ आजाराने आज निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. सिंगापूरच्या Mount Elizabeth Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष ते उपचार घेत होते.  2013 मध्ये त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली झालीच नाही.

उपचारांसाठी त्यांना नंतर सिंगापूरला हलविण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा अखेर झालीच नाही. अनेक वर्ष ते समाजवादी पक्षात महत्त्वाच्या भूमिकेत होते. दीर्घकाळ त्यांनी समाजवादी पक्षाचे महासचिव हे पदही भुषवलं होतं. त्यावेळी मुलायमसिंग यादव हे अमरसिंग यांच्याच सल्ल्याने कारभार करत असल्याचं म्हटलं जात होतं.

नंतर मात्र त्यांच्यात मतभेद होत गेले. समाजवादी पक्षाचा कारभार अखिलेश सिंग यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातली दरी वाढतच गेली होती. त्यानंतर ते समाजवादी पक्षातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता.

हेही वाचा - अमरसिंगांचं बॉलिवूडशी होतं ‘कलरफूल’ नातं, जया प्रदांना बनवलं थेट खासदार

बॉलिवूडशीही त्यांचा घनिष्ट संबंध होता. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींशी त्यांची मैत्री होती. त्यावरून अनेकदा ते अडचणीतही आले होते. बीग बी अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात मतभेद झाले होते. मात्र नंतर त्यांनी ते मतभेद मिटल्याचं जाहीर केलं होतं.

देशातल्या अनेक उद्योगपतींशीही त्यांची मैत्री होती. आपल्या वक्तव्यांमळे ते अनेकदा अडचणीतही आले होते. तसच त्यांनी वादही ओढवून घेतले होते. या मैत्रीचा फायदा त्यांनी समाजवादी पक्षाला करून दिला. अभिनेत्री जया बच्चन आणि जया प्रदा यांना समाजवादी पक्षातर्फे खासदारकी मिळाली होती. अमरसिंग यांच्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळाल्याचं म्हटलं जात होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 1, 2020, 5:05 PM IST
Tags: amar singh

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading