सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश, चेन्नईत केली घोषणा

रजनीकांत आपला स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करणार आहेत. आपण 234 जागांवर निवडणूक लढू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2017 10:13 AM IST

सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश, चेन्नईत केली घोषणा

चेन्नई, 31डिसेंबर : दाक्षिणात्य सुपरस्टार 'थलैवा' रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश झाला. आपल्या चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली.

रजनीकांत आपला स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करणार आहेत. आपण 234 जागांवर निवडणूक लढू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, ' काही लोक राजकारणाच्या नावावर लोकांना लुटतायत. त्यांच्या विरोधात मी आवाज उठवणार. आपण लोकशाहीचे रक्षक आहोत. चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला पाहिजे.

रजनीकांत यांच्या राजकारणातल्या प्रवेशामुळे तामिळनाडूच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी होतील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यांच्या राजकारण प्रवेशाची बरेच दिवस चर्चा सुरू होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.

 • तामिळनाडूतली सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे?

  - जयललितांच्या निधनानंतर मोठी पोकळी

  - अण्णा द्रमुक सत्तेत, पण पक्षात दुफळी

  - जयललितांच्या तोडीचा नेता सध्या अण्णा द्रमुकत नाही

  - 2011 पासून द्रमुक सत्तेत नाही

  - द्रमुकच्या स्टालिन आणि अळगिरीमध्ये वाद

  - करुणानिधींचं वय 93, फारसे सक्रिय नाहीत

  - काँग्रेस आणि भाजपचं अस्तित्व नगण्य

  - कॅप्टन विजयकांत यांच्या पक्षाचाही फारसा प्रभाव नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...