Home /News /national /

राजा अकबर यांच्या राजदरबारातील नवरत्न होता हा हिंदू राजा

राजा अकबर यांच्या राजदरबारातील नवरत्न होता हा हिंदू राजा

अकबराच्या दरबारात ते सेनापती म्हणून काम करत होते.

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : राजा मान सिंह हे राजा अकबर यांच्या राजदरबारातील नवरत्नांपैकी एक होते. अकबराच्या दरबारात ते सेनापती म्हणून काम करत होते. आमेरचा किल्ला त्यांनीच बांधला आहे. राजा मान सिंह यांच्या कारकीर्दीबाबत अनेक मतभेद इतिहासकारांमध्ये आहेत. आमेरचे राजा मान सिंह (Raja Man Singh) यांचा जन्म 21 डिसेंबर 1550 मध्ये झाला होता. राजा मान सिंह हे बादशहा अकबर यांच्या राजदरबारातील नवरत्नांपैकी एक होते. राजा अकबराच्या जवळ असल्याने त्यांना फर्जंद आणि मिर्झा राजे म्हणून देखील हाक मारत असतं. राजस्थानच्या आमेरमध्ये जन्मलेले राजा मान सिंह यांचे वडील राजा भगवानदास होते. त्यांच्या साहस, बुद्धिमत्तेमुळे ते अकबराच्या(Akbar) विश्वासू सरदारांमधील एक होते. राणी जोधाबाई या त्यांच्या भगिनी होत्या. आपल्या साहसी स्वभावामुळं त्यांनी अनेक लढायांमध्ये विजय मिळवले होते राजा मान सिंह (Raja Man Singh) हे खूपच धाडसी होते. आपल्या शासनकाळात त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळेच राजा अकबर यांनी त्यांना 1594 मध्ये राजा मान सिंह यांना पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, भारताचा दक्षिण भाग आणि काबूलचे शासक म्हणून नियुक्त केले होते. महान इतिहासकार कर्नल जेम्स टॉड (Colonel James Tod) यांनी राजस्थानच्या इतिहासात याविषयी सविस्तर लिहिले आहे. राजा मान सिंह यांच्या शूर कामगिरीमुळे काबूलच्या शासकाने देखील अकबराचे अधिपत्य स्वीकारलं होतं. जगन्नाथ मंदिर देखील राजा मान सिंह (Raja Man Singh) यांच्यामुळे वाचल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या सैन्याच्या कामगिरीमुळे ओडिशामधील पठाण मुसलमान आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक हिंदू राजांना या युद्धात पराभूत व्हावं लागलं होतं. या ठिकाणी मंदिर उद्धवस्त करून मशीद उभारण्याची ओडिशामधील पठाण मुस्लिमांची तयारी सुरू होती. याची माहिती मिळाल्यानंतर स्वतः राजा मान सिंह यांनी युद्ध करून त्यांचा पराभव केला होता. राजा मान सिंह (Raja Man Singh) यांनी जयपूरमध्ये(Jaipur) आमेर दुर्ग(Amer Durg) बांधला होता. जुन्या किल्ल्याच्या काही अवशेषांवर याची उभारणी करण्यात आली असून उंच डोंगरावर हा महाल बांधण्यात आला आहे. कालांतराने त्यांचे वंशज जय सिंह प्रथम यांनी याचा विस्तार केला. पण 1727 मध्ये सवाई जयसिंह द्वितीयच्या शासनकाळात जयपूरलाच आपली राजधानी म्हणून घोषित केले. राजा मान सिंह(Raja Man Singh) श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. त्याचबरोबर अनेक घाटांचे बांधकाम देखील त्यांनीच केले. आपल्या कालावधीत त्यांनी बनारसचा घाट, पाटण्याचा घाट, हरिद्वारच्या घाट असे नदीवरील घाट बांधले. श्रीकृष्णाचे भक्त असल्यानं त्यांनी वृंदावनमध्ये सात माजली श्रीकृष्णाचे भव्य मंदिर देखील उभारले होते. राजा मान सिंह (Raja Man Singh) आणि महाराणा प्रताप(Maharana Pratap) यांच्यातील हळदी घाटातील युद्ध खूप प्रसिद्ध आहे. इतिहासामध्ये याची आजही नोंद असून या युद्धात राजा मान सिंह यांनी आपल्या धाडसाचं दर्शन घडवलं होतं. यामागे एक कथा असून एकदा राजा मान सिंह मेवाडला गेले असता महाराणा प्रताप यांनी त्यांच्याबरोबर भोजन केलं नाही. त्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. या युद्धात महाराणा प्रताप हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यामुळं हे युद्ध जिंकून राजा मान सिंह (Raja Man Singh) यांनी मेवाड मुघल साम्राज्यामध्ये सामील केलं. इतिहासानुसार या युद्धात झालेल्या पराभवानंतर महाराणा प्रताप चार वर्षं जंगल आणि डोंगररांगांमध्ये आपलं जीवन जगत होते. इतिहासामधील नोंदीनुसार राजा मान सिंह (Raja Man Singh) यांना 1500 राण्या(Queens) होत्या. प्रत्येक राणीला 2 ते 3 मुले होती. पण अनेक मुलांचा मृत्यू हा त्यांच्या डोळ्यासमोरच झाला. मान सिंहांच्या मृत्यूबद्दल आजही ठोस पुरावा नसून मुस्लीम इतिहासकार आणि इतर इतिहासकारांमध्ये यावरून मतभेद आहेत. मुस्लीम इतिहासकारांच्या मते राजा मान सिंह यांचा मृत्यू 1615 मध्ये झाला तर इतर इतिहासकारांच्या मते त्यांचा मृत्यू खिलजीविरोधातील(Khiljee) लढाईत 1617 मध्ये झाला. परंतु याबद्दल अजूनही ठोस पुरावा आढळलेला नसून त्यांच्या मृत्यनंतर त्यांचा मुलगा भावसिंह हा सिंहासनावर बसला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Rajsthan

पुढील बातम्या