राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांचे संकेत

महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थानिक नेते हे मनसेला आघाडीत घेण्याच्या बाजूने फारसे इच्छुक नाहीत. पण आता राज आणि सोनियांच्या भेटीमुळे ही समिकरणं बदलण्याची शक्यता आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 8 जुलै :  नवी दिल्लीत असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज हे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सोनिया गांधींशी विविध विषयांवर चर्चा केली. ही भेट अर्ध्या तास चालली. महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी घटना समजली जाते. EVM मशिन संदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे नव्या समीकरणाचे संकेत असल्याचं मानलं जातंय. राहुल गांधी हे या भेटीच्यावेळी उपस्थित नव्हते अशीही माहिती आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थानिक नेते हे मनसेला आघाडीत घेण्याच्या बाजूने फारसे इच्छुक नाहीत. पण आता राज आणि सोनियांच्या भेटीमुळे ही समिकरणं बदलण्याची शक्यता आहे. EVMसोबतच या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आधी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना EVM बाबतचा संशय दूर करण्याची विनंती केली होती. मात्र निवडणूक आयोग फार काही करेल असं नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.

‘कर्नाटकातील आमदार राहुल गांधींना फॉलो करत आहेत’

EVM वर संशय

EVM मशिन्सच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्या मुद्यांवर राज यांनी निवडणूक आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडली. मनसेसहीत अनेक राजकीय पक्षांनी EVMवर संशय व्यक्त केला होता. EVM हॅक होऊ शकतं त्यामुळे यापुढच्या निवडणुका या EVM मशिन्सव्दारेच घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. राज ठाकरे आजच दिल्लीत दाखल झालेत.

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्याचं हे आहे सिक्रेट!

राज ठाकरे यांनी याआधीही अनेकदा EVMच्या वापरासंदर्भात आक्षेप घेतले होते. लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी राज यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन वादळ निर्माण केलं होतं. त्यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित झाला नाही. लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला होता.

First published: July 8, 2019, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading