News18 Lokmat

राज ठाकरेंचे कुंचल्यातून फटकारे; प्रशंसकच फिरवताहेत मोदींकडे पाठ

राज यांच्या फटक्यांचा प्रसाद आत्तापर्यंत अनेकांना बसलाय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 08:33 PM IST

राज ठाकरेंचे कुंचल्यातून फटकारे; प्रशंसकच फिरवताहेत मोदींकडे पाठ

मुंबई 28 डिसेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जसं आपल्या शब्दातून कोरडे ओढण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसच ते आपल्य कुंचल्यातूनही फटकारे ओढत असतात. या फटक्यांचा प्रसाद आत्तापर्यंत अनेकांना बसलाय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरे यांनी नवं व्यंगचित्र काढलं असून त्यात मोदींवर निशाणा साधलाय.

2019 मध्ये कोण पंतप्रधान होईल? असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारण्यात आला होता.  त्यावर उत्तर देताना बाबा म्हणाले, " सध्या एवढी अस्थिरता आहे की, 2019 मध्ये कोण पंतप्रधान होईल ते काहीच सांगता येत नाही." बाबा रामदेव हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक होते.

मात्र हवा बदलल्याने त्यांनीही सावध भूमिका घेतलीय. बाबा रामदेवच जर असं म्हणत असतील तर त्यात तथ्य असावं असं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून मांडलं आहे.

Loading...

या आधीही बाबा रामदेव यांनी अनेकदा मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. पंतप्रधान मोदी, भादपाध्यक्ष अमित शहा हे सातत्याने पुढची निवडणुक भाजपच जिंकणार असा दावा करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांच्या वक्तव्याची सोशल मीडियावरूनही चांगलीच चर्चा झाली होती.

राज ठाकरे यांचं भाऊबीज कार्टून : मोदींवर रुसलेली ही बहीण कोण?

राज ठाकरेंचं भाऊबीजेचं व्यंगचित्र पुन्हा एकदा मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याची टीका करणारं आहे. भारतमाता पंतप्रधानांची बहीण दाखवली आहे आणि त्यांच्या २०१४पासूनच्या आश्वासनांची आठवण करून देते आहे. भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रुसली आहे आणि गेल्या वेळी ओवाळलं आता मात्र नाही, असं म्हणतेय.

राज ठाकरेंचं भाऊबीजेचं व्यंगचित्र पुन्हा एकदा मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याची टीका करणारं आहे. भारतमाता पंतप्रधानांची बहीण दाखवली आहे आणि त्यांच्या २०१४पासूनच्या आश्वासनांची आठवण करून देते आहे. भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रुसली आहे आणि गेल्या वेळी ओवाळलं आता मात्र नाही, असं म्हणतेय. राज ठाकरेंची ही दिवाळी व्यंगचित्र मालिका धनत्रयोदशीपासून सुरू आहे.

राज यांनी धनत्रोयदशीच्या दिवशी फेसबुक आणि ट्विटरवर पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं. या व्यंगचित्रात देश अतिदक्षता विभागात असल्याचं धन्वंतरी जनतेला सांगत आहे. पहिल्याच व्यंगचित्रातून राज यांनी सरकारवर निशाणा साधत देशावर कर असलेल्या अत्याचाराचा मुद्दा मांडला.

धनोत्रयीदशीपासून सुरु केलेली व्यंगचित्राची मालिका सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. त्यानंतर नरक चतुर्थीलाही केंद्र सरकारवर भाष्य करणारं व्यंगचित्र काढलं. यात कारीटला अमित शहा यांचा चेहरा करण्यात आलं. भाजपला पडलेलं पहाटेचं स्वप्न असा उल्लेख त्यांनी व्यंगचित्रात केला आहे.

अमित शहांच्या व्यंगचित्रानंतर राज्य सरकारवर भाष्य करणार तिसरं व्यंगचित्र काढण्यात आलं. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अभ्यंगस्नान करण्यासाठी बसलेले असताना एक व्यक्ती त्यांच्या कानात संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला असल्याचे कुजबूजताना दाखवण्याक आलं आहे.

राज ठाकरेंकडून शेअर करण्यात आलेल्या या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर देवी लक्ष्मी हात जोडून उभी असल्याचे दाखवले आहे. देवी लक्ष्मी या तिघांकडे पाहून बाबांनो गेल्या साडेचार वर्षांत जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे, असे म्हणताना दाखविण्यात आले आहे.

नुकतंच राज यांनी त्यांचं पाचवं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केलं. पाडव्याच्या निमित्तानं काढलेल्या या व्यंगचित्रात सध्याचे युती सरकार राज्यातील शेतकऱ्याला ओवाळण्यासाठी आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्यांच्या कानात, ‘ओवाळणीत एक दमडी जरी टाकलीत तर याद राखा, ’ असं बजावताना दिसत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देऊन त्यांचा फायदा उठवत असल्याचे राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून दाखवले आहे.

यापूर्वीही राज ठाकरे यांनी मोदी शहा जोडीवर व्यंगचित्राचे फटकारे मारले होते. त्याची आठवण देणारी आणखी काही चित्रं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...