प्रदीर्घ आजाराने राज कपूर यांच्या पत्नीचे निधन

प्रदीर्घ आजाराने राज कपूर यांच्या पत्नीचे निधन

सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

मुंबई, १ ऑक्टोबर २०१८- कृष्णा राज कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कृष्णा यांच्या निधनाची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार ऋषी कपूर यांच्या घरी जात आहेत. ऋषी यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अधिक खालावली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव, रीमा आणि रितू ही पाच मुलं आहेत. १९४६ मध्ये राज कपूर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. करिष्कमा, करिना, रणबीर आणि रिद्धिमा कपूरच्या त्या आजी आहेत. वयाच्या ८७ वर्षीही त्या फार सक्रीय होत्या. त्या कौटुंबिक पार्टी, सिनेमांच्या प्रिमिअरला अनेकदा आवर्जुन उपस्थित राहायच्या. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबिय पॅरिसमध्ये उपस्थित होते.

१९८८ मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र जोडून ठेवले. आपल्या पाचही मुलांची जबाबदारी स्वीकारली. कृष्णा यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाकूळ वातावरण असून. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा राज कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

First Published: Oct 1, 2018 09:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading