देशाची मान उंचावली! अमेरिका कोरोनाशी लढण्यासाठी दिल्ली मॉडेलला करतोय फॉलो

देशाची मान उंचावली! अमेरिका कोरोनाशी लढण्यासाठी दिल्ली मॉडेलला करतोय फॉलो

दिल्लीला कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढा देणाऱ्या अमेरिकेने (America) दिल्ली मॉडलचा (Delhi Model) अवलंब केला आहे. कोविड -19 रुग्णांवरील उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरेपी (Plasma Therapy) च्या मॉडलचाही अवलंब केला जात आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी दिली.

यानंतर दिल्लीकरांना शुभेच्छा देत सीएम अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) ने ट्विट करुन सांगितले आहे. ते म्हणाले की, अमेरिका जे आज करीत आहे. भारत ते उद्या करेल..मात्र दिल्लीने हे बदललं आहे. आता काल दिल्लीने केलं आणि अमेरिका आज करीत आहे. यासाठी दिल्लीकरांना शुभेच्छा देतो. आपल्या देशासाठी ही अत्यंत सन्मानजनक गोष्ट आहे. यापूर्वी डोनाल्ड्र ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, आज मी चीनच्या व्हायरसविरोधात आमच्या लढाईत वास्तवात एक ऐतिहासिक घोषणा करणार आहे. ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकेल. आम्ही प्लाझ्मा थेरेपी सुरू करणार आहोत.

दिल्लीत प्लाज्मा थेरेपीची सुरुवात झाली. यासाठी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेतली होती. ज्याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. त्यानंतर दिल्लीत 2 जुलै रोजी आयएलबीएस रुग्णालयात प्लाज्मा बँक सुरू करण्यात आली. ज्याचा उद्देश कोविडच्या गंभीर रुग्णांना निशुल्क उच्च गुणवत्तेचा प्लाज्मा देणं हा होता.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या