मराठी बातम्या /बातम्या /देश /

रायपूरमध्ये बालाजी मंदिरात फॅशन शोचे आयोजन, बजरंग दलाचा निषेध, तक्रार केली दाखल

रायपूरमध्ये बालाजी मंदिरात फॅशन शोचे आयोजन, बजरंग दलाचा निषेध, तक्रार केली दाखल

फॅशन शोचा व्हिडीओ समोर आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, बजरंग दलाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाचा निषेध करत असून मंदिरात असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांकडून स्पष्टीकरण मागत असल्याचे दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

रायपूर 18 सप्टेंबर : छत्तीसगडमधील रायपूर येथील सालासर बालाजी मंदिरात फॅशन शोचे आयोजन करण्यात आलं होतं. तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालासर मंदिरात एफडीसीए नावाच्या कंपनीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शोवर बजरंग दलाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. हिंदू धार्मिक स्थळावर फॅशन शोचं आयोजन केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

या फॅशन शोचा व्हिडीओ समोर आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, बजरंग दलाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाचा निषेध करत असून मंदिरात असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांकडून स्पष्टीकरण मागत असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बजरंग दलाचे जिल्हा निमंत्रक रवी वाधवानी आल्यावर त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांशी संवाद साधला.

वाधवानी यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची तक्रार तेलीबांध पोलीस ठाण्यात केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. ओपइंडियाने वाधवानी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही.

दरम्यान, मंदिराच्या सभामंडपाचे रुपांतर फॅशन शोच्या स्टेजमध्ये झाल्याची  माहिती पसरताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी निदर्शने केली.  या घटनेमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि मंदिरांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करणे अयोग्य असल्याचे वाधवानी यांनी म्हटलं.

First published:

Tags: Fashion, Social media, Viral