जेव्हा अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची ब्रेकिंग न्यूज...

छत्तीसगडमधील न्यूज चॅनल आयबीसी-24 च्या न्यूज अँकर सुप्रीत कौर शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफीसला पोहोचल्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2017 10:38 PM IST

जेव्हा अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची ब्रेकिंग न्यूज...

08 एप्रिल : आताच एक दुख:द बातमी हाती आली आहे...अशी बातमी देणाऱ्या वृत्तवाहिनीच्या अँकरवर आयुष्यातील सर्वात वाईट बातमी देण्याची वेळ आली. छत्तीसगडमध्ये एका महिला अँकरला आपल्या पतीच्या अपघाताची बातमी द्यावी लागली. पण, भावनांना आवर घालत त्या अँकरने बातमीपत्र संपल्यानंतरच अश्रूंचा बांध मोकळा केला.

छत्तीसगडमधील न्यूज चॅनल आयबीसी-24 च्या न्यूज अँकर सुप्रीत कौर शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफीसला पोहोचल्या आणि नेहमीच्या वेळेवर स्टुडिओमध्ये जाऊन न्यूज बुलेटिन वाचायला त्यांनी सुरूवात केली. बुलेटिन दरम्यान महासमुंद जिल्ह्यातील पिथोरा इथं एका अपघाताची बातमी आली आणि अँकरने इतर बातम्यांप्रमाणे ती बातमी वाचली. आपण जी बातमी वाचतो आहोत त्यामध्ये आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.

रिपोर्टरचा फोनो झाल्यानंतर न्यूज एंकरला शंका आली. सुप्रीतने रिपोर्टरला फोन लावून अधिक माहिती घेतली. रिपोर्टर म्हणाला, गाडीत 5 जणं होते आणि ट्रकसोबत गाडीची टक्कर झाली. यामध्ये  तीन जणांचा जागीच मृत्यू झाला मात्र, मृतांची नावं रिपोर्टर सांगू शकला नाही.ठार झालेल्या तिघांचे वर्णन त्याने सांगितलं.

त्यांचे वर्णन ऐकल्यावर आपला पती हर्शष कवाडे या अपघातात ठार झाला आहे याची तिला शंका आली. कारण ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्याच दिशेनं आपलं पती 4 मित्रांसोबत गेले असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि सर्व प्रकार सुप्रीतच्या लक्षात आला.

हादरवून टाकणा-या या वृत्तानंतरही बुलेटिन संपवूनच सुप्रीत यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली आणि कशाबशा स्टुडिओच्या बाहेर पडल्या.

Loading...

28 वर्षांच्या सुप्रित कौर यांचं एक वर्षापूर्वी हर्षद कवादे यांच्यासोबत लग्न झालं होतं. ते दोघं रायपूरमध्ये वास्तव्यास होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...