भाजपचा मोठा निर्णय ! या राज्यातल्या एकाही खासदाराला मिळणार नाही तिकीट

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 10:30 AM IST

भाजपचा मोठा निर्णय ! या राज्यातल्या एकाही खासदाराला मिळणार नाही तिकीट

रायपूर, 20 मार्च : लोकसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं कंबर कसली आहे. भाजपकडून सत्ता कायम टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या रणनीती आखल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्तीसगडचे भाजप प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत भाजपनं छत्तीसगडमधील सर्वच्या सर्व 10 आजी खासदारांचं तिकीट कापण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनंही या निर्णयास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे भाजपला राज्यातील सत्तादेखील गमवावी लागली होती. याच कारणामुळे पुन्हा असा फटका सहन करावा लागू नये यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यातील आजी खासदारांचा पत्ता कापण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातूनही एक मोठी बातमी समोर आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कानपुरातून मुरली मनोहर जोशी यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. जोशींऐवजी उत्तर प्रदेशातले कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांना संधी मिळू शकते. तसंच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंह यांना एटातून तिकीट दिलं जाऊ शकतं. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवतील, असं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भाजपनं उत्तर प्रदेशात आपल्या 24 उमेदवारांची यादी बनवली केली आहे.


Loading...


वाचा अन्य बातम्या

Lok sabha election 2019 सर्वच पक्षांचे मोठे नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक - मुख्यमंत्री

काटोल पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

दादा, अपमान सहन करू नका! कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना घातली साद

VIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...