छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पुन्हा घडवला भूसुरुंग स्फोट; एक जवान शहीद,5 लोकांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पुन्हा घडवला भूसुरुंग स्फोट; एक जवान शहीद,5 लोकांचा मृत्यू

या स्फोटात एका जवान शहीद झाला आहे तर ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

छत्तीसगड, 08 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बस्तर दौऱ्याच्या आधी पुन्हा एकदा माओवाद्यांनी दंतेवाड्यात भुसुरूंग स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एका जवान शहीद झाला आहे तर 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

माओवाद्यांनी दंतेवाडा येथील बाचेली भागात एका बस जवळ स्फोट घडवला. या स्फोटात सीआयएसएफचा एक जवान शहीद झाला. या स्फोटात आणखी दोन सीआयएसएफचे जवान जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अॅन्टी माओवादी आॅपरेशनच्या स्पेशल डीजी डीएम अवस्थी यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश नगर बाचेली इथं सीआयएलएफचा जवान भाजी खरेदीसाठी जात होता. याच दरम्यान डोंगराजवळ माओवाद्यांनी बसवर निशाणा साधला आणि भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या बसमध्ये इतर स्थानिक लोकंही होते त्यामुळे मृतांची संख्या 5 वर पोहोचली.

या स्फोटात दोन जवान जखमी झाले त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ९ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बस्तर भागात दौरा करणार आहे. परंतु, दोन्ही नेत्यांचा दौरा हा दंतेवाडा परिसरात नसला तरी माओवाद्यांच्या हल्ल्याची गेल्या १० दिवसातली ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात ३० आॅक्टोबर रोजीही दंतेवाडा येथील आरनपूरमध्ये माओवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात चार जवान शहीद झाले होते. तर दुरदर्शनच्या एका कॅमेऱ्यामॅनचा मृत्यू झाला होता.

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading