Home /News /national /

अचानक झाली सफरचंदांची बरसात, जिकडे तिकडे ऍपलच ऍपल; कारण वाचून बसेल धक्का

अचानक झाली सफरचंदांची बरसात, जिकडे तिकडे ऍपलच ऍपल; कारण वाचून बसेल धक्का

एका गावात रस्त्यावर, शेतात आणि (Rain of apple in the village surprises villagers) पाहिल तिकडं सफरचंदांचा खच पाहून गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

    पटना, 20 ऑक्टोबर : एका गावात रस्त्यावर, शेतात आणि (Rain of apple in the village surprises villagers) पाहिल तिकडं सफरचंदांचा खच पाहून गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पूरग्रस्त भागातील गावकरी (Apples spread everywhere in the village) रात्री झोपून जेव्हा सकाळी जागे झाले, तेव्हा आसपासच्या परिसरात हजारो सफरचंदं पसरली होती. सफरचंदांचा पाऊस पडला की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती होती. पण जेव्हा सत्य समजलं, तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसला. ट्रकातून आली सफरचंदं बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील एका गावात सकाळच्या सुमाराला गावभर सफरचंदं पसरली होती. गावकऱ्यांनी घरातून पिशव्या, पोती, गोण्या जे मिळेल ते आणलं आणि सफरचंदं आपापल्या घरी नेली. अनेकांनी दोन ते तीन वेळा सफरचंदं घरी नेली. मात्र तरीही रस्त्यावर सफरचंदांचा खच पडला होता. एवढी सफरचंदं आली कुठून, याची जोरदार चर्चा गावात रंगली होती. दारु माफियांनी आणली सफरचंदं या भागात दारूमाफियांचं जाळं मजबूत असल्याचं सांगितलं जातं. दारु माफियांनी एका ट्रकमध्ये दारूच्या बाटल्या भरल्या होत्या. त्या लपवण्यासाठी वरून सफरचंदं भरली आणि सफरचंदाचा व्यापार करत असल्याचं भासवून दारू आणली. ही दारू इच्छित स्थळी पोहोचवल्यानंतर त्यांनी या गावात ट्रक रिकामा केला आणि सफरचंदं इथंच टाकून ते निघून गेले. त्यामुळे गावात अक्षरशः सफरचंदांचा पूर आला होता. नुकताच पूर येऊन गेल्यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या या भागातील गावकऱ्यांना सफरचंद मिळणं, हादेखील एक प्रकारे आधारच वाटत होता. हे वाचा- जबरदस्त! भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा: 'ही' राज्यं ठरली अग्रेसर गावकऱ्यांना संशय दारुमाफियांनी दारू लपवण्यासाठी जरी सफरचंदं आणली असतील, तरी ती अशी गावात टाकून का दिली, याबद्दल काही गावकऱ्यांच्या मनात संशय आहे. दारूच्या तुलनेत सफरचंदं स्वस्त असतील, तरी ती काही रस्त्यावर फेकून देण्याइतपत स्वस्त नसतात. त्यामुळे यामागे आणखी काही कारण आहे का, याचा विचार गावकरी करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Apple, Bihar, Liquor stock

    पुढील बातम्या