मराठी बातम्या /बातम्या /देश /सणांच्या तोंडावर Railwayची प्रवाशांना भेट, 392 नव्या गाड्या सुरू होणार; जाणून घ्या वेळापत्रक

सणांच्या तोंडावर Railwayची प्रवाशांना भेट, 392 नव्या गाड्या सुरू होणार; जाणून घ्या वेळापत्रक

रेल्वेने आता आरक्षण (Reservation)  संदर्भातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ट्रेन्स सुटण्याआधी 5 मिनिटपर्यंत आरक्षण करता येणार आहे.

रेल्वेने आता आरक्षण (Reservation) संदर्भातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ट्रेन्स सुटण्याआधी 5 मिनिटपर्यंत आरक्षण करता येणार आहे.

रेल्वेने आता आरक्षण (Reservation) संदर्भातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ट्रेन्स सुटण्याआधी 5 मिनिटपर्यंत आरक्षण करता येणार आहे.

नवी दिल्ली 13 ऑक्टोबर:  नवरात्र, दसरा, दिवाळी आणि छठपूजा हे मोठे उत्सव आता सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रेल्वेने (Indian Railway)  प्रवाशांच्या सुविधेसाठी नव्या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात या गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. नेहमीच्या गाड्यांपेक्षा या फेस्टिवल गाड्यांचं भाडं हे 30 टक्के जास्त असणार आहे.

या ट्रेन्समध्ये फक्त  3AC कोच असणार आहेत अशी माहिती रेल्वेने दिली आहे. यात काही गाड्या दररोज, काही आठवड्यातून दोन दिवस, चार, दिवस अशा असणार आहेत.

रेल्वेने आता आरक्षण (Reservation)  संदर्भातही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ट्रेन्स सुटण्याआधी 5 मिनिटपर्यंत आरक्षण करता येणार आहे. कोरोनामुळे काही प्रमाणातच रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे सेवांमध्ये अमुलाग्र परिवर्तन करण्याची सरकारची योजना असून त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालय (Indian Railway) कामाला लागलं आहे. रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यासाठी केंद्राने महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार आता लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्यांमधले Sleeper कोच हटविण्यात येणार असून या गाड्या वातनुकूलीत असणार आहेत. गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी हा निर्णय सुरूवातीला प्रायोगिक स्तरावर घेतला जाणार आहे.

या नव्या गाड्यांचा वेग हा ताशी 130 ते 160 किमी एवढा राहणार आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा वेग 130 किमीपेक्षा जास्त केला तर त्यात तांत्रिक अडचणी येतात असं तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवून वाहतूकीचा वेळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Indian railway