मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदींनी लॉकडाउन 2.0 ची घोषणा करताच रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

मोदींनी लॉकडाउन 2.0 ची घोषणा करताच रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

14 एप्रिलनंतर भारतीय रेल्वे पुन्हा रुळावर येईल अशी शक्यता होती. पण आताही शक्यता मावळली आहे.

  • Published by:  sachin Salve
नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउन वाढवण्यात आल्यामुळे रेल्वे मंत्रालयानेही रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात अखंडपणे चालणाऱ्या भारतीय रेल्वेची चाकं कोरोना व्हायरसमुळे जागच्या जागी थांबली आहे. आधी 14 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे रेल्वेनं सर्व प्रकारच्या गाड्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून मालगाडी सुरू आहे. हेही वाचा - देशात कोरोनाच्या वाढत्या फैलावात दिलासादायक बातमी, केरळकरांचं मनापासून अभिनंदन परंतु, आज पंतप्रधान मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  त्यामुळे मध्य रेल्वेने आपली पॅसेंजर सेवाही 3 मेपर्यंत स्थगित केली आहे.  मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, 'प्रीमियम रेल्वे, मेल गाड्या / एक्स्प्रेस, पॅसेंजर रेल्वे, उपनगरीय लोकल गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे यासह देशभरातील सर्व रेल्वे वाहतूक 3 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. हेही वाचा - BLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू 14 एप्रिलनंतर भारतीय रेल्वे पुन्हा रुळावर येईल अशी शक्यता होती. त्यानुसार, आयआरसीटीसीवर रेल्वे प्रवासाचे बुकिंगही सुरू होते. पण, लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ज्या प्रवाशांनी तिकीटं बूक केली आहे. त्या सर्व प्रवाशांचे पैसे हे परत दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी मागितली या 7 मुद्यांवर तुमची मदत दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत काही ठिकाणी शिथील करण्याचेही संकेत दिले आहे. कोरोनाचा प्रसार जिथे कमी असेल तिथे सूट दिली जाणार आहे. पण त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचं कठोरपणे पालन झालं तरच हा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. त्यासोबत मोदींनी देशातील जनतेकडे 7 मुद्यांवर साथ देण्याची विनंती केली आहे. कोणतेही आहे ते 7 मुद्दे? 1. आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्या. ज्यांना जुने आजार असतील,त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशा सर्व वृद्ध व्यक्तींचा  कोरोनापासून बचाव करायचा आहे, त्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे. 2. सार्वजनिक ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्या.  सोशल डिस्टिंसिंगचा वापर करा. दोन लोकांमधील अंतर हे 3 फूटांपेक्षा जास्त ठेवा. घरात तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करा 3. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचं आहे.  आरोग्य प्रशासनाकडून याबद्दल सूचना देण्यात आल्या आहे, त्याचं पालन करा 4. कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करा, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊन लोड करा, लोकांनाही हा अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगा 5. जेवढं शक्य होईल, तेवढी गरीब कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या घराशेजारी किंवा परिसरात असणाऱ्या गरिबांची योग्य ती खबरदारी घेऊन मदत करा 6. आपण करत असलेला व्यवसाय, उद्योग क्षेत्रात सोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल आदर ठेवा. कुणालाही  नोकरीवरून काढू नका 7. कोरोनायोद्धा जे आहे, त्यामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, सर्वांची काळजी घ्या, त्यांना मदत करा संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या