अखेर आली सोलार रेल्वे, सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा

अखेर आली सोलार रेल्वे, सुरेश प्रभूंनी दाखवला हिरवा झेंडा

सोलार पॅनलमधून मिळणाऱ्या ऊर्जेतून ट्रेनच्या सगळ्या कोचेसमधली पंखे आणि लाईट्सची गरज भागवली जाणार आहे.

  • Share this:

14 जुलै : भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. भारताची पहिली वहिली सोलार रेल्वे अखेर रुळावर उतरली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते आज या रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलंय.

1600 एचएचपीची ही ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्ट्रीत बनवली गेली असून हीच आयुष्य 25 वर्ष आहे. या ट्रेनच्या एका डब्यात 89 लोकं प्रवास करू शकतील. या ट्रेनमुळे कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन 200 टनने कमी  होणार आहे. ट्रेनमध्ये डिझेल इंजिन बसवण्यात आलं असून सोलार पॅनलमधून मिळणाऱ्या ऊर्जेतून ट्रेनच्या सगळ्या कोचेसमधली पंखे आणि लाईट्सची गरज भागवली जाणार आहे. ही ट्रेन दिल्लीतल्या सराई रोहिला पासून हरियाण्यातल्या गर्ही हरसारू स्टेशनपर्यंत धावणार आहेत. दररोज दीड तासाचा प्रवास ही ट्रेन करणार आहे.

या ट्रेनची किंमत 13.54 कोटी इतकी असून, प्रत्येक डब्याची किंमत 1 कोटी आहे तर दोन मोटर कोचेसची किंमत 2.5 कोटी रूपये इतकी आहे. या ट्रेनच्या सहा डब्यांवर सोलार पॅनल्स बसवले आहेत. एका सोलार पॅनेलची किंमत 9 लाख रूपये आहे.

तसंच प्रत्येक डब्यात कुशन सिट्सही दिल्या गेल्या आहेत. एकूण 300 वॅटचे 16 सोलार पॅनल्स या ट्रेनवर बसवले आहेत. यांची ऊर्जा बॅटरीमध्ये स्टोअर करून रात्रीही वापरली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक डब्यामागे 2 लाख रूपयांचे डिझेल दरवर्षी वाचणार आहे. वर्षभरात जवळपास 672 कोटी रूपयांची बचत या सोलार ट्रेनमुळे होणार असल्याचं म्हटलं जातंय.

First published: July 14, 2017, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading