मुंबई ते दिल्ली रेल्वेनं पोहोचणार 2 तासाआधी, आली तिसरी राजधानी !

मुंबई ते दिल्ली रेल्वेनं पोहोचणार 2 तासाआधी, आली तिसरी राजधानी !

सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेबरोबर पैसेही वाचणार आहेत. कारण भाडंही इतर २ राजधानींपेक्षा सहाशे ते आठशे रुपयांनी कमी असणार आहे.

  • Share this:

14 आॅक्टोबर : मुंबई आणि दिल्लीदरम्यानचा प्रवास आता आणखी सुपरफास्ट आणि स्वस्त होणार आहे. कारण मुंबई-दिल्लीदरम्यान तिसरी राजधानी एस्क्प्रेस सुरू होतेय. सोमवारपासून ही गाडी सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे नेहमीच्या राजधानी एक्स्प्रेसपेक्षा ही एक्स्प्रेस २ तास आधीच पोहोचणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही गाडी मुंबईहून सुटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेबरोबर पैसेही वाचणार आहेत. कारण भाडंही इतर २ राजधानींपेक्षा सहाशे ते आठशे रुपयांनी कमी असणार आहे.

एअरलाईन्सकडे वळणाऱ्या प्रवाशांना खेचण्यासाठी रेल्वेनं हा उपक्रम सुरू केलाय. ३ महिने प्रायोगिक तत्तावर ही नवी राजधानी चालेल, मग तिचा आढावा घेतला जाईल. कारण रेल्वेनं जरी २ तास कमी लागण्याचा दावा केला असला, तरी तो प्रत्यक्षात खरा ठरतो का हे रेल्वेलाही कळायचंय.

अशी असेल नवी राजधानी ?

- नवी राजधानी एक्स्प्रेस १४ तासांत दिल्लीला पोहचवणार, सध्या या प्रवासासाठी १६ ते १७ तास लागतात

- तीनच थांबे असणार, सुरत, बडोदा आणि कोटा

- दोन्ही ठिकणाहून दुपारी 4च्या सुमाराला सुटणार, आणि ६ वाजता पोहोचणार.

- यामुळे उतरल्यावर प्रवाशांना सकाळच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही

- मुंबईहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुटणार

- नवी दिल्लीहून बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी सुटणार

- भाडं इतर दोन राजधानींपेक्षा 600 ते 800 रुपयांनी कमी असणार

- जेवण ऑप्शनल असणार, ते तिकीट बुक करतानाच विचारलं जाणार. इतर दोन राजधानींमध्ये जेवणाचे पैसे द्यावेच लागतात.

- एक फर्स्ट एसीचा डबा, २ सेकंड एसीचे डबे आणि थर्ड एसीचे १२ डबे असतील

- एक ऐवजी २ इंजिन असतील, ज्यामुळे वेग वाढवायला आणि कमी करायला मदत होईल

First published: October 14, 2017, 6:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading