मराठी बातम्या /बातम्या /देश /भुताच्या भीतीने 42 वर्षे बंद राहिलेले भारतातील रेल्वे स्टेशन; सूर्यास्तानंतर एकही कर्मचारी थांबत नसे

भुताच्या भीतीने 42 वर्षे बंद राहिलेले भारतातील रेल्वे स्टेशन; सूर्यास्तानंतर एकही कर्मचारी थांबत नसे

42 वर्षे बंद राहिलेले भारतातील रेल्वे स्टेशन

42 वर्षे बंद राहिलेले भारतातील रेल्वे स्टेशन

Begunkodar Railway Station : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात बेगुनकोडोर नावाचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन 1960 मध्ये उघडण्यात आले होते. मात्र, 7 वर्षानंतरच येथे काही विचित्र घटना घडू लागल्या आणि ते बंद करण्यात आले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च : तुम्ही लहानपणी आजी-आजोबांकडून भुताखेताच्या कथा नक्कीच ऐकल्या असतील. पण, तुमच्यापैकी क्वचितच लोकांना याचा प्रत्यक्षात अनुभव आला असेल. आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जिथे भूत असल्याचा दावा केला जात होता. खरंतर तिथे भूत असल्याचे कधीच सिद्ध होऊ शकले नाही. मात्र, भुतांच्या भीतीमुळे ती सार्वजनिक जागा एकदोन नाही तर 42 वर्षे बंद ठेवण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील एका रेल्वे स्टेशनची ही कथा आहे. या स्टेशनचे नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन आहे. ते 1960 मध्ये सुरू करण्यात आलं होतं.

हे स्टेशन सुरू झाल्यानंतर काही वर्षे ते सुरळीत सुरू राहिले, पण 7 वर्षानंतरच तेथे काही विचित्र घटना घडू लागल्या. 1967 मध्ये बेगुनकोडोरच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. त्याच स्टेशनवर रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाल्याची अफवाही पसरली होती. दुसऱ्या दिवशी त्या रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगितले, पण त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. रिपोर्ट्सनुसार, स्टेशन मास्तरने पांढऱ्या साडीत एक महिला रात्रीच्या अंधारात रुळांवर चालताना पाहिली.

वाचा - कुत्रा पाहून भीती वाटते का? या 5 टीप्स करतील तुमची मदत

भूत पाहिल्यानंतर स्टेशन मास्तरचा मृत्यू झाला

त्यानंतर स्टेशन मास्तर आणि त्यांचे कुटुंबीय रेल्वे क्वार्टरमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या मृत्यूंमध्ये त्याच भूताचा हात असल्याचा दावा येथे राहणाऱ्या लोकांनी केला होता. या घटनेनंतर कर्मचारी आणि परिसरात भिती पसरली. सूर्यास्तानंतर येथे कोणीही थांबायला तयार होईना. लोक इतके घाबरले होते की संध्याकाळी ते स्टेशन आणि आसपासच्या परिसरातून पळ काढायचे. या भयंकर घटनांनंतर बेगुनकोडोर हे झपाटलेले रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागले.

42 वर्षे स्टेशन बंद

लोक म्हणायचे की जेव्हा कधी सूर्यास्त झाल्यावर एखादी ट्रेन इथून जात असे तेव्हा त्या सोबत बाईचे भूत धावत असे आणि कधी कधी ती ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावून तिला ओव्हरटेक करत असे. याशिवाय अनेकवेळा ट्रेनसमोर रुळांवर नाचताना दिसल्याचा दावा करण्यात आला होता. लोक स्टेशनवर यायला इतके घाबरले की 42 वर्षे स्टेशन बंद होते. म्हणजेच 42 वर्षांपासून एकही ट्रेन येथे थांबली नाही. इथून ट्रेन जात असे, पण बेगुनकोडोर स्टेशनवर येताच तिचा वेग वाढवला जात होता. मात्र, 2009 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा या स्थानकाचे उद्घाटन केले.

First published:
top videos