डेहराडून, 19 ऑक्टोबर : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा (Railway track submerged under water in uttarakhand) जोर वाढला असून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. या पावसामुळं राज्यभरात हाहाकार उडाला असून रस्ते आणि रेल्वेमार्गदेखील (Roads and railway track under water) पाण्याखाली गेले आहेत. अनेक दुर्गम भागात नागरिक अडकून पडले असून चमोली-बद्रीनाथ राष्ट्रीय (national highway closed) महामार्ग सध्या बंद ठेवण्यात आला आहे.
#WATCH | A portion of the railway line connecting Kathgodam and Delhi near Gaula river in Uttarakhand's Haldwani was damaged earlier today amid heavy rainfall in the region. pic.twitter.com/onYhSwhdlK
— ANI (@ANI) October 19, 2021
रेल्वे ट्रॅकही गेले वाहून
या पावसानं रेल्वे ट्रॅकचं प्रचंड नुकसान झालं असून ट्रॅकचा बराचसा भाग पाण्याच्या जोराने वाहून गेल्याचं चित्र दिसत आहे. कथगोडम-दिल्ली रेल्वे मार्गावरचा बराचसा भाग पाण्यात वाहून गेला असून नदीकिनारच्या परिसरात रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान झालं आहे. रेल्वे ट्रॅकचा व्हिडिओ त्याची स्थिती दाखवण्यासाठी पुरेसा असून अद्यापही पावसाचा जोर ओसरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवरून बातचित करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू
आतापर्यंत 27 जणांचा या पुरामुळे मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. अद्यापही अनेकजण राज्यातील वेगवेगळ्या भागात अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मदतकार्यासाठी तीन हेलिकॉप्टर्सची मदत सध्या घेण्यात येत आहे. या पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून पुढचं वर्षं कसं काढायचं, या चिंतेत शेतकरी आहेत.
हे वाचा- गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंड बनला चोर, सॅनिटरी पॅडही करायचा लंपास; असं फुटलं बिंग
कुमाऊ परिसरात सर्वाधिक नुकसान
उत्तराखंडच्या कुमाऊ परिसरात सर्वाधिक नुकसान झालं आहे. राज्यात झालेल्या एकूण 27 मृत्यूंपैकी 11 मृत्यू एकट्या कुमाऊ परिसरात झाले आहेत. राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या नैनितालमध्ये गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत असून सर्व भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर ओसरला नाही, तर परिसरातील इमारती पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railway, Rain flood, Uttarakhand