'त्या' कपमधून चहा देणारा पर्यवेक्षक निलंबित

'त्या' कपमधून चहा देणारा पर्यवेक्षक निलंबित

दिल्लीहून उत्तराखंडमधल्या काठगोदामला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिलेल्या चहाच्या कपाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चहाच्या कपवर ‘मै भी चौकीदार’ असं लिहिण्यात आलं होतं. याला विरोधकांनी आक्षेप घेतला.

  • Share this:

दिल्ली, २९ मार्च : निवडणुकांच्या तोंडावर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना वेगवेगळ्या माध्यमांतून प्रचार केला जात आहे. ‘चौकीदार चोर है’ या राहुल गांधीच्या टीकेवर कायमच नरेंद्र मोदींनी हजरजबाबीपणे उत्तर दिलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार’ असं कॅन्पेनिंग सुरू केलं आहे. ‘मै भी चौकीदार’ ची हवा चक्क ट्रेनमध्येही पाहायला मिळाली.

मै भी चौकीदार

दिल्लीहून उत्तराखंडमधल्या काठगोदामला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिलेल्या चहाच्या कपाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चहाच्या कपवर ‘मै भी चौकीदार’ असं लिहिण्यात आलं होतं. या वाक्याखाली निरनिराळे संदेशही देण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोनंतर रेल्वेनं एका पर्यवेक्षकावर कारवाई केली आहे. ‘मै भी चौकिदार’ कपातून चहा दिल्याप्रकरणी या पर्यावेक्षकाचं निलंबन करण्यात आलं. अशा पद्धतीनं प्रचार करणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा विरोधक आणि काही लोकांचा दावा आहे.

अशा कपमधून दिली होती कॉफी

याआधीही रेल्वेमध्ये अशा कपमधून कॉफी देण्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे आता घडलेल्या प्रकारानंतर ही कारवाई झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मै भी चौकीदार'या नावाने कॅम्पेन सुरू केलं आहे.या प्रचारामुळे चौकीदार हा शब्द सोशल मीडियावर ट्रेन्ड झाला. पण रेल्वे प्रवाशांना चहाची सेवा देताना हा शब्द वापरणं हा थेट प्रचाराचा भाग आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

यााधीच्या निवडणुकीत मोदींचा 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम गाजला होता. आता रेल्वेमध्ये चहासोबतच चौकीदार हा शब्दही आल्याने त्याची बरीच चर्चा झाली.


 


 

VIDEO : विरोधक म्हणजे 'शराब', पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 05:03 PM IST

ताज्या बातम्या