Elec-widget

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, बदलतंय ट्रेनचं रूप, मिळतील 'या' सुविधा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, बदलतंय ट्रेनचं रूप, मिळतील 'या' सुविधा

रेल्वे प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी रेल्वेनं खास योजना तयार केलीय.

  • Share this:

मुंबई, 25 मे : रेल्वे प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा देण्यासाठी रेल्वेनं खास योजना तयार केलीय. या अंतर्गत पश्चिम रेल्वेनं 23 गाड्यांमध्ये बदल केलेत. प्रवाशांसाठी त्या आकर्षक केल्यात. भारतीय रेल्वेनं 2018-19मध्ये देशभर जवळजवळ 140 रेल्वे गाड्या अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला होता. यात 20 ट्रेन्सना अपग्रेड करण्याचं काम पश्चिम रेल्वेला मिळालं होतं. पश्चिम रेल्वेनं मार्च 2019पर्यंत 19 रेल्वे गाड्या अपग्रेड केल्या होत्या.

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग मिळू शकते सरकारी नोकरी

या योजनेअंतर्गत ट्रेनचं बदलतंय रूप

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना नवा लूक आणि फील देण्यासाठी रेल्वेनं इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या जुन्या डब्यांना नव्या स्वरूपात आणण्याची तयारी केलीय.

निवडणूक संपताच कथित गोरक्षकांची दादागिरी; महिलेसह 2 मुस्लीम तरुणांना मारहाण

Loading...

रेल्वेच्या या डब्यांमध्ये उत्कृष्ट योजनेअंतर्गत अनेक बदल केले जातायत. डब्यात शिरल्या शिरल्या प्रवाशांना आल्हाददायी वाटेल, असा बदल झालाय. ट्रेनमधल्या टाॅयलेटमध्येही बरेच बदल केलेत.

'मी शिवसैनिकच, राहुल गांधींची मुलाखत पैसे घेऊन केली'

आता मिळतेय ही सुविधा

पूर्ण ट्रेन रंगांनी सजवली जातेय. प्रत्येक डब्यात एलईडी लायटिंग लावलं जातंय. डब्यांच्या आत स्टेनलेस स्टिल पॅनलिंग आणि अँटी स्किड फ्लोअरिंग आहे. कचऱ्याचा डबाही स्टेनलेस स्टिलचा आहे. बाथरूममध्ये मोठमोठे आरसे लावलेत. ट्रेनमध्ये हायब्रिड डिझाइन बायो टाॅयलेट केली जातायत. एका रेल्वे गाडीला आकर्षक करण्यासाठी जवळजवळ 60 लाख रुपये खर्च येतोय.


SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 03:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...