बंगळुरू,म्हैसूर, उटी इथे फिरायला जायचंय? जाणून घ्या IRCTCचं पॅकेज

बंगळुरू,म्हैसूर, उटी इथे फिरायला जायचंय? जाणून घ्या IRCTCचं पॅकेज

IRCTC च्या या रोमांचक प्रवासाची सुरुवात 25 मेपासून होणार आहे. यात पर्यटक 3ACमध्ये प्रवास करणार आणि ट्रिपल शेयरिंग रूम त्यांना दिली जाणार.

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल : उन्हाळ्याच्या सुट्टीत इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC)नं पर्यटकांसाठी खास पॅकेज आणलंय. IRCTCनं उन्हाळ्याच्या सुट्टीत बंगळुरू, म्हैसूर, उटी इथे पर्यटकांना फिरवून आणण्याचं ठरवलंय. IRCTC च्या या रोमांचक प्रवासाची सुरुवात 25 मेपासून होणार आहे. या पॅकेजमध्ये एका व्यक्तीला 21, 590 रुपये पडणार आहेत. यात पर्यटक 3ACमध्ये प्रवास करणार आणि ट्रिपल शेयरिंग रूम त्यांना दिली जाणार.

पॅकेज डिटेल्स

बंगळुरू, म्हैसूर, उटी समर स्पेशल एसी टुरिस्ट ट्रेन 25 मे 2019ला छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्टेशनवरून सकाळी 6.30 वाजता सुटेल. या टुरिस्ट ट्रेनमध्ये 3AC, 2AC आणि 1AC हे पर्याय आहेत.

किती होणार खर्च?

7 रात्री आणि 8 दिवसांच्या या टूरमध्ये ट्रिपल शेअरिंग हवं असेल तर 21, 590 रुपये पडतील. ट्विन शेअरिंग हवं असेल तर 22,790 रुपये पडतात. सिंगल रूम फर्स्ट एसी हवी असेल तर 35,060 रुपये खर्च येईल.

कुठे कुठे मिळणार फिरायला?

IRCTCच्या या पॅकेजमध्ये बंगळुरूला विधानसभा, लालबाग, बाॅटेनिकल गार्डन, टिपू सुलतान पॅलेस आणि बुल टेंपल हे पाहायला मिळणार. म्हैसूरमध्ये वृंदावन गार्डन, चामुंडी हिल, नंदी मंदिर, महिषासूर मूर्ती, म्हैसूर पॅलेस इथे भेट देता येईल. उटीमध्ये रोज गार्डन, बोटॅनिकल गार्डन, माउंटन ट्रेन आणि कोन्नुरमध्ये पाइन फाॅरेस्ट, लॅम्प्स राॅक, डाॅल्फिन हाऊस इथे जाता येईल.

IRCTC प्रमाणे पॅकेजप्रमाणे एसी हाॅटेलमध्ये राहायला मिळतं. एसी कारमधून फिरवतात. याशिवाय नाश्ता, डिनर आणि रोज एक लीटर पिण्याचं पाणी मिळेल.

असं करा बुकिंग

तुम्ही IRCTC च्या वेबसाइटवर आॅनलाइन पॅकेज बुक करू शकता. याशिवाय IRCTCच्या पर्यटक सुविधा केंद्र, तुमच्या भागातलं आॅफिस इथे बुकिंग करू शकतात.

VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

First published: April 9, 2019, 4:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading