• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोरोनाच्या भयंकर स्थितीदरम्यान रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारहून अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी

कोरोनाच्या भयंकर स्थितीदरम्यान रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारहून अधिक स्पेशल ट्रेनला मंजुरी

रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी 133 गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी 88 ट्रेन समर स्पेशल (Summer Special Trains), तर 45 खास उत्सवासाठी असणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 16 एप्रिल : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रसार (Second Wave of Covid-19) पाहाता भारतीय रेल्वेने 70 टक्के विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत रेल्वे येत्या दोन आठवड्यात आणखी 133 गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे. त्यापैकी 88 ट्रेन समर स्पेशल (Summer Special Trains), तर 45 खास उत्सवासाठी असणार आहेत. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात 9 हजार 622 विशेष ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच देशभरात दररोज 7 हजारहून अधिक ट्रेन धावतील. कोरोना महामारीपूर्वी दररोज सरासरी 11 हजार 283 गाड्या रुळावर धावत होत्या. सध्या देशात 5 हजार 387 उपनगरी गाड्या धावत आहेत. यातील सर्वाधिक गाड्या मध्य रेल्वे क्षेत्रांतर्गत आहेत, यात मुंबई व पुणे या भागांचा समावेश आहे. हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; 30 साधूंना कोरोनाची लागण, चाचण्यांना वेग मध्य रेल्वे क्षेत्रात सध्या 82 टक्के मेल एक्सप्रेस आणि 25 टक्के लोकल गाड्या सुरू आहेत. रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आश्चर्यकार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, कोरोनाचा प्रसार वाढत असल्यानं लॉकडाऊनच्या भीतीनं प्रवासी कामगार मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे प्रवास करत आहेत. अशात विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणखीच वाढत असल्याची स्थिती आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ - कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन देशासाठी अत्यंत घातक ठरत आहे. अशातच देशात कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in India) संख्येमध्ये दररोज नवे उच्चांक नोंदले जात आहे. गुरुवारच्या चोवीस तासात देशात कोरोना (Corona Update) रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2 लाख 16 हजार 850 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे
  Published by:Kiran Pharate
  First published: