रेल्वे मंत्रालयाची हायटेक भरारी, रेल्वेवर असणार 'ड्रोन'ची नजर

रेल्वे मंत्रालयाची हायटेक भरारी, रेल्वेवर असणार 'ड्रोन'ची नजर

  • Share this:

08 जानेवारी : मागील वर्षात वाढत्या रेल्वे दुर्घटना पाहता रेल्वेने आता रूळांची निगा राखण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.  ड्रोनच्या साह्यायाने फक्त रूळांचीच देखरेख केली जाणार नसून रेल्वे मंत्रालयातून देशभरातील आपल्या रेल्वे विभागातील कामावरही नजर ठेवणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज परिपत्रक प्रसिद्ध करून ड्रोनचा वापर करणार असल्याचं जाहीर केलं. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या मुख्यालयात मुख्य कंट्रोल रूम असणार आहे. यातून देशभरातील रेल्वे झोनमधील कामाची पाहणी करणार आहे.

गर्दी हाताळण्यासाठी आणि सर्व बोर्डमध्ये देखभाल काम मॉनिटर करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ड्रोन कॅमेरा रेल्वेच्या विविध उपक्रमांकरिता वापरला जाईल, विशेषतः प्रकल्पांची देखरेख आणि ट्रॅक आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखरेखीसाठी असल्याचं रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या मध्य प्रदेश जबलपुर डिव्हिजनने आधीच हे ड्रोन्स मिळवले आहेत. या ड्रोनचा पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपुर विभाग, भोपाळ विभाग, आणि कोटा विभाग या तीन विभागात परिक्षण करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 09:52 PM IST

ताज्या बातम्या