मराठी बातम्या /बातम्या /देश /

लांब पल्ल्यांच्या Railway गाड्यांमध्ये आता Sleeper कोचला सुट्टी मिळणार, अशी आहे सरकारची नवी योजना

लांब पल्ल्यांच्या Railway गाड्यांमध्ये आता Sleeper कोचला सुट्टी मिळणार, अशी आहे सरकारची नवी योजना

या नव्या गाड्यांचा वेग हा ताशी 130 ते 160 किमी एवढा राहणार आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा वेग 130 किमीपेक्षा जास्त केला तर त्यात तांत्रिक अडचणी येतात असं तज्ज्ञांच मत आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 11 ऑक्टोबर: रेल्वे सेवांमध्ये अमुलाग्र परिवर्तन करण्याची सरकारची योजना असून त्यादृष्टीने रेल्वे मंत्रालय (Indian Railway) कामाला लागलं आहे. रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यासाठी केंद्राने महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार आता लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्यांमधले Sleeper कोच हटविण्यात येणार असून या गाड्या वातनुकूलीत असणार आहेत. गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी हा निर्णय सुरूवातीला प्रायोगिक स्तरावर घेतला जाणार आहे.

या नव्या गाड्यांचा वेग हा ताशी 130 ते 160 किमी एवढा राहणार आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा वेग 130 किमीपेक्षा जास्त केला तर त्यात तांत्रिक अडचणी येतात असं तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवून वाहतूकीचा वेळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

सर्वच गाड्यांसाठी हा बदल करण्यात येणार नाही तर फक्त लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठीच हा प्रयोग करण्यात येणार आहे. या नव्या एसी गाड्यांचं भाडं हे सुद्धा जास्त नसेल असंही रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितल्याची माहिती ‘आज तक’ने दिली आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी आता मुलाखतीचं टेंशन नाही, महाराष्ट्रातही नियम लागू

या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सध्या 83 एसी कोचेस असून त्यांची संख्या वाढवून ही 200 पर्यंत येण्याचा सरकारचा विचार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षीत व्हावा यासाठी हा प्रयत्न असल्याचं विभागाचं म्हणणं आहे.

हे सगळे बदल हे टप्प्या टप्प्याने केले जाणार आहेत. सुरूवातीच्या टप्प्यातल्या बदलांचे अनुभव लक्षात घेऊन पुढचे बदल केले जाणार असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पक्षाच्या आमदारांचं बंड, राजीनाम्याची केली मागणी

कोरोनामुळे रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.  सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून फक्त मोजक्याच गाड्या सुरू आहेत. सुरूवातीचे दोन महिने तर सर्व वाहतूक बंद होती. या काळात फक्त मालवाहतूक सुरू होती.

First published:

Tags: Indian railway