भविष्यात 'असे' असतील रेल्वेचे डबे

भविष्यात 'असे' असतील रेल्वेचे डबे

हे सगळे डिटेल्स डब्यात दिसणार आहेत. तसंच, चाकांची अवस्था, तसंच रुळाला तडे गेले असतील त्याची माहिती रेल्वेच्या कंट्रोल रुमला लगेच मिळू शकणार आहे.

  • Share this:

13 मे:  भविष्यात रेल्वेचे डबे कसे दिसतील, याची झलक रेल्वेने नुकतीच दाखवलीय.  रेल्वेच्या नव्या डब्यांचा फोटो भारतीय रेल्वेनं प्रसिद्ध केलाय.

यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक खिडक्यांऐवजी एका बाजूला एकच सलग खिडकी असेल. त्याचबरोबर डब्याची सध्याची परिस्थिती, तापमान, स्वच्छता शेवटची कधी केली होती, टाकीत किती पाणी आहे.  हे सगळे डिटेल्स डब्यात दिसणार आहेत. तसंच, चाकांची अवस्था, तसंच रुळाला तडे गेले असतील त्याची माहिती रेल्वेच्या कंट्रोल रुमला लगेच मिळू शकणार आहे. कारण डब्याखाली अनेक सेन्सर्स लावण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी आणखी एक फीचर यात देण्यात आलंय, ते म्हणजे विमानात असतो तसा ब्लॅकबॉक्स.

रेल्वेचे नवे डबे  

- एकच सलग आणि मोठी खिडकी

- ऑन बोर्ड कंडिशन मॉनिटरिंग सिस्टम

- डब्याची संपूर्ण माहिती रेल्वेला सतत मिळत राहणार

- डब्यात, डब्याखाली आणि चाकांवर सेन्सर बसवणार

- हादरे, धक्के आणि तापमानाची नोंद होणार

- सरासरीपेक्षा जास्त हादरे बसले तर डबा दुरुस्तीला पाठवणार

- दुरुस्तीचं वेळापत्रकही सतत अपडेट करता येणार

- एसी, पाणी, लाईटची अवस्था सगळ्यावर नजर ठेवणार

- सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही

- सीसीटीव्हीचं फुटेज वाय-फायनं कंट्रोल रुमला जाणार

First published: May 13, 2018, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading