Home /News /national /

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रेल्वेने रद्द केल्यात 32 ट्रेन; स्टेशनला जाण्यापूर्वी एकदा जरूर पाहा Cancelled Train List

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रेल्वेने रद्द केल्यात 32 ट्रेन; स्टेशनला जाण्यापूर्वी एकदा जरूर पाहा Cancelled Train List

Railway Train Cancelled List : रेल्वेने प्रवास करणार असाल तर ट्रेन रद्द केल्याचं हे वेळापत्रक एकदा जरूर पाहा.

नवी दिल्ली, 30 जून : पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक जण ट्रेकिंगला आणि फिरायला जातात. तुम्हीही जुलै महिन्यातल्या पहिल्या पंधरवड्यात कुठे फिरण्याचा किंवा बाहेर जाण्याचा प्लॅन केला असेल आणि रेल्वेने प्रवास करणार असाल (Railway Train timetable), तर कदाचित  तुम्हाला तुमचा प्लॅन बदलावा लागू शकतो. कारण भारतीय रेल्वे प्रशासानाने तब्बल 32 ट्रेन्स कॅन्सल केल्या आहेत (32 Train cancelled). उत्तर प्रदेशच्या वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या 32 ट्रेन्स 15 जुलै 2022 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. झाशीहून महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेश (MP), गुजरात (Gujrat) आणि हैदराबादला (Hyderabad) जाणाऱ्या या ट्रेन आहेत (Cancelled Train list). या सर्व गाड्या मध्य प्रदेश, गुजरातमधले काही जिल्हे, मुंबई आणि हैदराबाद यादरम्यान धावतात. कानपूर जिल्ह्यातल्या भीमसेन, गोपामाऊ, रसूलपूर आणि पामा या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाचं काम सुरू आहे. या ट्रॅक दुहेरीकरणात इंटरलॉकिंगचं काम न झाल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे वाचा - मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पला भुस्खलनाचा तडाखा; 30 ते 40 जवान अडकल्याची भीती, 7 जवानांचा मृत्यू झाशी विभागीय रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार सिंह यांनी सांगितलं, की कानपूरमध्ये सुरू असलेल्या इंटरलॉकिंगच्या कामामुळे 15 जुलैपर्यंत एकूण 32 गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यासोबतच काही गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी एकदा ट्रेनचं ताजं वेळापत्रक तपासून घ्यावं आणि मगच प्रवास करावा, म्हणजे गैरसोय होणार नाही, असं आवाहन मनोज कुमार सिंह यांनी प्रवाशांना केलं आहे. महाराष्ट्रात जाणाऱ्या या गाड्या होणार कॅन्सल 1. ट्रेन क्रमांक 01051, लोकमान्य टिळक टर्मिनल-महू - साप्ताहिक - 30.06.2022 रोजी धावणार नाही. 2. ट्रेन क्रमांक 01052, महू-लोकमान्य टिळक टर्मिनल - साप्ताहिक - 02.07.2022 रोजी कॅन्सल. 3. ट्रेन क्रमांक 15102, लोकमान्य टिळक टर्मिनल-छपरा - साप्ताहिक - 07.07.2022 आणि 14.07.2022 रोजी धावणार नाही. 4. ट्रेन क्रमांक 15101, छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस - साप्ताहिक - 05.07.2022 आणि 12.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 5. ट्रेन क्रमांक 22122, लखनौ-लोकमान्य टिळक टर्मिनस - साप्ताहिक - 10.07.2022 रोजी धावणार नाही. 6. ट्रेन क्रमांक 22121, लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनौ - - साप्ताहिक - 09.07.2022 रोजी धावणार नाही. 7. ट्रेन क्रमांक 11408, लखनौ-पुणे - साप्ताहिक - 07.07.2022 आणि 14.07.2022 रोजी धावणार नाही. 8. ट्रेन क्रमांक 11407, पुणे-लखनौ - साप्ताहिक - 05.07.2022 आणि 12.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 9. ट्रेन क्रमांक 12104, लखनौ-पुणे - साप्ताहिक - 06.07.2022 आणि 13.07.2022 रोजी धावणार नाही. 10. ट्रेन क्रमांक 12103, पुणे-लखनौ - साप्ताहिक - 05.07.2022 आणि 12.07.2022 राजी कॅन्सल असेल. 11. ट्रेन क्रमांक 12598, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर - साप्ताहिक - 06.07.2022 आणि 13.07.2022 रोजी धावणार नाही. 12. ट्रेन क्रमांक 12597, गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - साप्ताहिक - 05.07.2022 आणि 12.07.2022 रोजी कॅन्सल असेल. गुजरातला जाणाऱ्या रद्द झालेल्या ट्रेन्सची यादी 1. ट्रेन क्रमांक 09465 - अहमदाबाद-दरभंगा - साप्ताहिक - 01.07.2022 आणि 08.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 2. ट्रेन क्रमांक 09466 - दरभंगा-अहमदाबाद - साप्ताहिक - 04.07.2022 आणि 11.07.2022 रोजी धावणार नाही. 3. ट्रेन क्रमांक 22468, गांधीनगर कॅपिटल-वाराणसी - साप्ताहिक - 07.07.2022 आणि 14.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 4. ट्रेन क्रमांक 22467, वाराणसी-गांधीनगर कॅपिटल - साप्ताहिक - 06.07.2022 आणि 13.07.2022 रोजी धावणार नाही. मध्य प्रदेशला जाणाऱ्या रद्द झालेल्या ट्रेन्सची यादी 1. ट्रेन क्रमांक 12536, रायपूर-लखनौ - आठवड्यातील 2 दिवस, 08.07.2022 आणि 15.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 2. ट्रेन क्रमांक 12535, लखनौ-रायपूर - आठवड्यातील 2 दिवस, 07.07.2022 आणि 14.07.2022 रोजी धावणार नाही. 3. ट्रेन क्रमांक 04144, कानपूर सेन्ट्रल-खजुराहो - रोज धावणारी, 08.07.2022 ते 15.07.2022 पर्यंत कॅन्सल असेल. 4. ट्रेन क्रमांक 04143, खजुराहो-कानपूर सेन्ट्रल - रोज धावणारी, 07.07.2022 ते 14.07.2022 पर्यंत धावणार नाही. 5. ट्रेन क्रमांक 15206, जबलपूर-लखनौ - रोज धावणारी, 13.07.2022, 14.07.2022 आणि 15.07.2022 रोजी रद्द असेल. 6. ट्रेन क्रमांक 15205, लखनौ-जबलपूर - रोज धावणारी, 12.07.2022, 13.07.2022 आणि 14.07.2022 रोजी कॅन्सल असेल. हैदराबादला जाणाऱ्या रद्द झालेल्या ट्रेन्सची यादी 1. ट्रेन क्रमांक 02576, गोरखपूर-हैदराबाद - साप्ताहिक - 03.07.2022 आणि 10.07.2022 रोजी धावणार नाही. 2. ट्रेन क्रमांक 02575, हैदराबाद-गोरखपूर - साप्ताहिक - 01.07.2022 आणि 08.07.2022 रोजी कॅन्सल असेल. रद्द झालेल्या आणखी काही ट्रेन्सची यादी 1. ट्रेन क्रमांक 19305, डॉ. आंबेडकर नगर-कामाख्या - साप्ताहिक - 30.06.2022 आणि 07.07.2022 रोजी धावणार नाही. 2. ट्रेन क्रमांक 19306, कामाख्या- डॉ. आंबेडकर नगर - साप्ताहिक - 03.07.2022 आणि 10.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 3. ट्रेन क्रमांक 14109, चित्रकूट धाम-कानपूर सेन्ट्रल, रोज धावणारी 07.07.2022 ते 14.07.2022 पर्यंत कॅन्सल असेल. 4. ट्रेन क्रमांक 14110 कानपूर सेन्ट्रल-चित्रकूट धाम - रोज धावणारी 07.07.2022 ते 14.07.2022 पर्यंत कॅन्सल असेल. 5 ट्रेन क्रमांक 01802, कानपूर सेन्ट्रल-मानिकपूर - रोज धावणारी, 12.07.2022, 13.07.2022 आणि 14.07.2022 तारखेपर्यंत कॅन्सल असेल. 6. ट्रेन क्रमांक 01801, मानिकपूर-कानपूर सेन्ट्रल - रोज धावणारी, 12.07.2022, 13.07.2022 आणि 14.07.2022 रोजी धावणार नाही. 7. ट्रेन क्रमांक 11110, लखनौ-वीरांगना लक्ष्मीबाई - रोज धावणारी, 13.07.2022 आणि 14.07.2022 रोजी कॅन्सल असेल. 8. ट्रेन क्रमांक 11109, वीरांगना लक्ष्मीबाई-लखनौ - रोज धावणारी, 13.07.2022 आणि 14.07.2022 धावणार नाही. हे वाचा - अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलाच्या तब्बल 350 तुकड्या तैनात; दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सज्ज दरम्यान ज्यांनी आधीच तिकिटं बुक केली असतील, त्यांचे पैसे रेल्वेकडून परत दिले जातील, असंही नोज कुमार सिंह यांनी सांगितलं.
First published:

Tags: Indian railway, Railway, Train, Travel

पुढील बातम्या