मराठी बातम्या /बातम्या /देश /रेल्वे प्रशासनाची चक्क देवाला नोटीस; हनुमानजींनी त्यांचं मंदिर स्वतःच पाडावं अन्यथा…

रेल्वे प्रशासनाची चक्क देवाला नोटीस; हनुमानजींनी त्यांचं मंदिर स्वतःच पाडावं अन्यथा…

न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मंदिराबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसीमुळे रेल्वे प्रशासन चांगलंच चर्चेत आलं आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मंदिराबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसीमुळे रेल्वे प्रशासन चांगलंच चर्चेत आलं आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मंदिराबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसीमुळे रेल्वे प्रशासन चांगलंच चर्चेत आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Banda, India

बांदा, 27 जानेवारी : उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बांदा रेल्वे स्थानक परिसरात पुरातन काळातील एक हनुमानाचं मंदिर आहे. मात्र काही कारणांमुळे हे मंदिर पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने मंदिराबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसीमुळे रेल्वे प्रशासन चांगलंच चर्चेत आलं आहे. हनुमानजींनी त्यांचं मंदिर स्वत: पाडावे, अन्यथा हे मंदिर 15 दिवसांनंतर पाडण्यात येईल असं या नोटीसमध्ये रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. सध्या या नोटीसीची जोरदार चर्चा सुरू आहे. ही नोटीस निर्दशनास आल्यानंतर अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली असून, कार्यकर्त्यांकडून या नोटीसचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या बांदामधील आहे. बंदा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकवर एक हनुमानाचं पुरातन मंदिर आहे. मात्र काही कारणांमुळे हे मंदिर पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक नोटीस तयार करून ती या मंदिराच्या बाहेर लावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये हनुमानजींनी त्यांचं मंदिर स्वत: पाडावे, अन्यथा हे मंदिर 15 दिवसांनंतर पाडण्यात येईल असं म्हटलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आलेल्या या नोटीसची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

एबीव्हीपी आक्रमक

रेल्वे प्रशासनाने काढलेल्या या नोटीसीनंतर विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे. हनुमानजींनी त्यांचं मंदिर स्वत: पाडावे, अन्यथा हे मंदिर 15 दिवसांनंतर पाडण्यात येईल असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे. या घटनेनंतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले व त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मंदिराच्या एका विटेलाही धक्का लागू देणार नसल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

First published: