पेन्शनसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाने बदललं लिंग

पेन्शनसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाने बदललं लिंग

एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाने त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पेन्शनसाठी लिंग बदलल्यामुळे रेल्वे खातं पेचात सापडलं आहे. गेल्या 160 वर्षांत अशा प्रकारचा पेच पहिल्यांदाच निर्माण झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,26 जून : एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाने त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पेन्शनसाठी लिंग बदलल्यामुळे रेल्वे खातं पेचात सापडलं आहे. गेल्या 160 वर्षांत अशा प्रकारचा पेच पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. याबदद्ल रेल्वेने केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र 32 वर्षांच्या एका व्यक्तीने लिहिलं आहे. ही व्यक्ती आता लिंग बदलून मुलगी झाली आहे आणि आता ही महिला रेल्वेकडून फॅमिली पेन्शनची मागणी करत आहे. तिचे वडील रेल्वेमध्ये कर्मचारी होते. त्यांचा 2017 मध्ये मृत्यू झाल्यानंतर आता ही फॅमिली पेन्शनची मागणी झाली आहे.

कुणाला मिळते पेन्शन ?

रेल्वे कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातल्या सदस्यांनाच रेल्वेमार्फत पेन्शन मिळते. त्या कर्मचाऱ्याला मुलगा नसेल किंवा मुलाचं वय 25 वर्षांपेक्षा कमी असेल तरच ही पेन्शन दिली जाते. एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याला मुली असतील आणि त्यांचं लग्न झालं नसेल तर या कर्मचाऱ्याचं कुटुंब रेल्वेकडे पेन्शन मागू शकतं. म्हणूनच या 32 वर्षांच्या तरुणाने लिंग बदललं आहे.

अधिकाऱ्यांसमोर पेच

चेन्नईमधल्या दक्षिण रेल्वेच्या कार्यालयात 2018 मध्ये हे पत्र आलं आहे. त्यानंतर इतके दिवस या पत्रावर काय निर्णय घ्यायचा, असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पडल आहे. यावर कोणताही निर्णय न झाल्याने रेल्वेने आता हे प्रकरण केंद्राकडे पाठवलं आहे.

रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला पेन्शन देण्याची पद्धत चालत आली आहे. ज्या कर्मचाऱ्याला 25 वर्षांपेक्षा मोठा मुलगा असेल त्या कुटुंबाला रेल्वे पेन्शन देत नाही. चेन्नईच्या या प्रकरणात हा तरुण 32 वर्षांचा आहे. त्यामुळेच त्याने लिंग बदलून पेन्शन मिळवण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले...

रेल्वे कर्मचाऱ्याला जर अविवाहित किंवा घटस्फोटित मुलगी असेल तर त्या कुटुंबाला पेन्शन द्यावी की नाही याबदद्ल रेल्वेचे स्पष्ट नियम नाहीत. या सगळ्या गोंधळामुळेच लिंग बदललेल्या या तरुणाला पेन्शन द्यायची की नाही यावर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

समलिंगींबदद्ल धोरण नाही

जेव्हापासून वडील जिवंत होते तेव्हापासून मी महिलेचंच जीवन जगत होतो, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. मी अविवाहित असल्यामुळे या पेन्शनला योग्य ठरते, असाही या व्यक्तीचा दावा आहे.

केंद्र सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये समलैंगिक कल्याण संघटनेचं एक प्रमाणपत्र मिळालं आहे. या आधारे या व्यक्तीचा समावेश समलैंगिक श्रेणीमध्ये होऊ शकतो. पण तरीही पेन्शनबद्दलचा पेच कायम राहील. कारण पेन्शन धोरणामध्ये समलिंगींबदद्ल कोणतंही स्पष्ट धोरण नाही.

===========================================================================================================

VIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण

First published: June 27, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading