Home /News /national /

राईस कुकरपासून प्रेशर कुकरपर्यंत लाचखोर अधिकाऱ्याच्या स्वयंपाकघरात अधिकाऱ्यांना सापडलं घबाड!

राईस कुकरपासून प्रेशर कुकरपर्यंत लाचखोर अधिकाऱ्याच्या स्वयंपाकघरात अधिकाऱ्यांना सापडलं घबाड!

केरळमध्ये एका लाचखोर अभियंत्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे अधिकारीही चक्रावून गेले. संबंधित अधिकाऱ्याने राईस कुकरपासून प्रेशर कुकरपर्यंत प्रत्येकी 50,000 रुपये किमतीच्या बंडलमध्ये 16.60 लाख रुपये स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये लपवले होते.

पुढे वाचा ...
    कोची, 17 डिसेंबर : केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील एका लाचखोर अभियंत्याला (Kerala engineer arrested for taking bribe) नुकतीच अटक करण्यात आली होती. राज्याच्या प्रदूषण नियामक मंडळावर (KSPCB) काम करणाऱ्या या अभियंत्याला एका उद्योजकाकडून 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं (KSPCB engineer arrested) होतं. मात्र, त्याच्या घरी टाकलेल्या धाडीनंतर व्हिजिलन्स डिपार्टमेंटचे अधिकारीही चक्रावून गेले. ए.एम. हॅरिस (AM Harris) असं या लाचखोर अभियंत्याचं नाव आहे. 51 वर्षांच्या हॅरिसने आपल्या एकूण कार्यकाळात बरीच माया जमवली होती. लाच घेताना अटक केल्यानंतर बुधवारी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी घरात किती पैसे आहेत असं विचारल्यावर, त्याने 16 लाख 60 हजार रुपये घरात असल्याचं सांगितलं. हा आकडा अगदीच परफेक्ट असल्याचे पाहून अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्यक्तीने राईस कुकर, प्रेशर कुकर आणि इतर भांड्यांमध्ये (KSPCB engineer hid bribe money in vessels) ही रोख रक्कम लपवून ठेवली होती. 50-50 हजार रुपयांचे बंडल त्याने अशा प्रकारे लपवले होते. साधा पगार, उच्च राहणीमान तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हॅरिसच्या बँक खात्यातही 18 लाख रुपये होते. तसेच, मूळचा पठानमथिट्टा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हॅरिसची एकूण तीन जिल्ह्यांमध्ये संपत्ती होती. अलुवा शहराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या ओबेरॉन कॉम्प्लेक्समध्ये (Kerala engineer bribe case) त्याचा तब्बल 80 लाख रुपये किंमतीचा फ्लॅट होता. या फ्लॅटमध्ये 2 लाख रुपयांचा टीव्ही सेट, आणि दीड लाख रुपयांची म्युझिक सिस्टिमही तपास अधिकाऱ्यांना सापडली. लग्नानंतर आठ दिवसात नवऱ्यानं असं काय केलं की.. पत्नी गेली Boyfriend कडे, मंदिरात केलं लग्न यासोबतच हॅरिसने परदेश वाऱ्यांवरही बरेच पैसे खर्च केले होते. त्याचा पासपोर्ट तपासला असता त्याने जर्मनी, व्हिएतनाम, युक्रेन, मलेशिया, थायलंड अशा सुमारे डझनभर देशांची सफर केली असल्याचे स्पष्ट झाले. एकूण संपत्ती, हॅरिसचे राहणीमान आणि त्याचा पगार याचा कुठेच ताळमेळ नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. अविवाहित असणाऱ्या हॅरिसची डिपार्टमेंटमधील प्रतिमा अगदीच स्वच्छ होती. त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे त्याच्याबद्दलचे मतही चांगले होते. अर्थात, त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत इतर कर्मचाऱ्यांना अगदी थोडीच माहिती होती. याबाबत बऱ्याच चर्चाही त्यांच्यामध्ये रंगत होत्या, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. कोरियातून दिली 7 लाखांची सुपारी, चारित्र्याच्या संशयावरून केला चुलतीचा खून असा सापडला जाळ्यात जॉबिन सबॅस्टियन नावाच्या एका व्यक्तीचा रबर तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातील मशीन्सचा अतिशय जास्त आवाज होत असल्याची तक्रार आजूबाजूच्या लोकांनी केली होती. यामुळे जॉबिनला याचे लायसन्स रिन्यू करण्यात अडचण येत होती. “यामुळे आधीच्या एका अधिकाऱ्याने आपल्याकडे लायसन्स रिन्यू करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तर हॅरिसने हे काम 25 हजारांमध्ये करून देण्याचे म्हटले होते” अशी माहिती जॉबिनने दिली. हॅरिस पैशांची मागणी करत असतानाचा व्हिडिओ त्याने कोट्टायमच्या तपास अधिकाऱ्यांकडे दिला होता. यानंतर तपास अधिकाऱ्यांनी केमिकलने मार्क केलेल्या नोटा जॉबिनला देऊन ते पैसे हॅरिसला देण्यास सांगितले. यानंतर पथकाने हॅरिसला त्याच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली.
    First published:

    Tags: IPS Officer, Kerala

    पुढील बातम्या